Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio आणि Airtel ने मिळून दिला Vi झटका, पाहा डिटेल्स

20

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल कंपन्या फायद्यात सुरू आहे. तर वोडाफोन आयडिया कंपनीला लागोपाठ नुकसान झेलावे लागत आहेत. जर जानेवारी २०२३ ची आकडेवारी पाहिली तर रिलायन्स जिओने १.६५ मिलियन नवीन यूजर्स जोडले आहेत. तर भारती एअरटेलवरून जोडणारी संख्या १.२८ मिलियन झाली आहे. गावात जिओचे ०.९२ मिलियन नवीन यूजर्सने साथ दिली आहे. तर एअरटेल सोबत जोडणाऱ्या नवीन यूजर्सची संख्या ०.६१ मिलियन झाली आहे.

वोडाफोन आयडियाला होतेय नुकसान
या दरम्यान वोडाफोन आयडियाला जबरदस्त नुकसान होत आहे. वोडाफोन आयडियाने डिसेंबर २०२२ च्या तुलनेत जानेवारी २०२३ मध्ये १.३६ मिलियन यूजर्स गमावले आहेत. तर वोडाफोन आयडियाचा यूजर बेस कमी होवून २३९.९ मिलियन झाला आहे. तर जिओचा बेस वाढून ४२६.१ मिलियन झाला आहे. भारती एअरटेलचा यूजर बेस वाढून ३६८.८ मिलियन झाला आहे. याचा खुलासा टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायच्या आकडेवारीवरून झाला आहे.

वाचाः गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल

BSNL च्या लँडलाइनचा जलवा कायम
जिओने वायरलेस सोबत वायरलाइन सेगमेंट मध्ये आपली जबरदस्त वर्चस्व दाखवले आहे. जिओ सोबत जानेवारी मध्ये ०.२१ मिलियन वायरलाइन यूजर्स जोडले आहे. याच प्रकारे जिओच्या वायरलाइन यूजर्सची संख्या ८.६१ मिलियन झाली आहे. परंतु, यानंतरही ८.६ मिलियन डॉलर सोबत बीएसएनएल टॉपवर आहे. परंतु, मार्केट लीडर बीएसएनएलच्या वायरलाइन यूजर्सच्या संख्येत जानेवारी १९ हजार ७८१ कमी सोबत नोंदली गेली आहे. लँडलाइन यूजर्समध्ये एअरटेल तिसऱ्या स्थानी आहे.

वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स

वोडाफोन आयडियाच्या अडचणी वाढल्या
रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून देशात ५जी सर्विस रोलआउट करण्यात आली आहे. वोडाफोन आयडियाकडून ५जी सर्विसला कधीपर्यंत रोलआउट केले जाईल. यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. खरं कंपनी लागोपाठ नुकसान झेलत आहे.

वाचाः OnePlus 10R 5G च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात, फोन ७ हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.