Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Oppo कंपनीचा हा दमदार स्मार्टफोन ५ हजाराने स्वस्त, २५६ जीबी स्टोरेजसह ६७ वॅट चार्जिंगचाही ऑप्शन

10

नवी दिल्लीः सध्या बाजारात विविध कंपन्यांचे दमदार फीचर्ससह स्मार्टफोन उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही मिड प्रीमियम असा अफलातून फिचर्सवाला फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा असल्यास एक चांगला पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे ओप्पो कंपनीचा Oppo Reno 7 Pro हा स्मार्टफोन. हे मॉडेल सध्या अगदी स्वस्तात खास डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. Oppo Reno 7 Pro वर 5,000 रुपयांची सूट मिळत आहे. Oppo Reno 7 Pro गेल्याच वर्षी भारतात लॉन्च झाला होता.

दरम्यान दमदार फीचर्स असणाऱ्या या Oppo Reno 7 Pro च्या किमतीत पाच हजार रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळ हा फोन आता 34,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. Oppo Reno 7 Pro भारतात 39,999 रुपये इतक्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Oppo Reno 7 Pro नवीन किंमतीसह कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.विशेष म्हणजे फ्लॅट डिस्काउंटसह खास बॅकिंग ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. कंपनी ICICI आणि Kotak बँक कार्ड्सवर अतिरिक्त 2,000 रुपये सूट देखील देत आहे.

कसा आहे Oppo Reno 7 Pro
Oppo Reno 7 Pro 5G मध्ये Android 11 आधारित ColorOS 12 देण्यात आला आहे. याशिवाय, यात 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 90Hz आहे आणि संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek 1200-Max प्रोसेसर, 12 GB RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. RAM 7 GB पर्यंत वाढवता येते.

वाचाः iPhone 14 Price : लेटेस्ट आयफोन घेण्यासाठी हीच आहे योग्य वेळ, लेटेस्ट मॉडेलवर खास ऑफर

कॅमेऱ्याचा विचार केल्यास Oppo Reno 7 Pro 5G मध्ये तीन रेअर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर आहे. त्याच वेळी, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आहे आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. यात सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. कॅमेरासोबत कलर टेंपरेचरसाठी सेन्सरही देण्यात आला आहे. नेटवर्कचा विचार केल्यास Oppo Reno 7 Pro 5G वर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन 65W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4500mAh ड्युअल सेल बॅटरी पॅक करतो. फोनचे वजन म्हणाल तर 180 ग्रॅम आहे.

वाचाः Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.