Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

itel कंपनीने बाजारात आणले ५ नवे स्मार्ट टीव्ही, किंमतही खिशाला परवडणारी, १०,९९९ पासून सुरूवात

8

नवी दिल्ली: सध्याच्या स्मार्ट युगात सर्व उपकरणंही स्मार्ट होताना दिसत आहेत. अशातच आता घरोघरी स्मार्ट टीव्ही येत असून आयटेल (itel Smart TV) कंपनीने देखील ५ नवे स्मार्ट टीव्ही बाजारात आणले असून अगदी १०,९९९ पासून या टीव्हींची किंमत सुरु होते. आयटेलनं नुकतीच भारतात त्यांची G-Series ही स्मार्ट टीव्ही सीरिज लॉन्च केली. या सीरिजमध्ये विशेष गोष्ट म्हणजे दमदार डिस्प्ले आणि साऊंड सिस्टिममुळे युजर्सना अल्ट्रा ब्राईट डिस्प्लेसह वायब्रेट एक्सपीरियन्सही वापरकर्त्यांना अनुभवता येणार आहे.

तर कंपनीने एकूण ५ नवे टीव्ही लॉन्च केले आहेत. हे सर्वच मॉडेल अगदी दमदार फीचर्स असणारे आहेत. दरम्यान कंपनीने (itel) लॉन्च केलेल्या G4366, G5066 आणि G5566 या मॉडेल्सची साईज म्हणाल तर अनुक्रमे ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंच अशी आहे. तसंच या मॉडेल्सची किंमत म्हणाल तर ४३ इंच टीव्ही किंमत २१,९९९, ५० इंच टीव्हीची किंमत २८,९९९ आणि ५५ इंच टीव्हीची किंमत ३३,९९९ इतकी आहे. याशिवाय या सीरिजमध्ये G3265 आणि G4365 हे स्मार्ट अॅन्ड्रॉईड टीव्ही देखील लॉन्च केले आहेत. त्यांची किंमत १०,९९९ आणि १८,९९९ अशी असन अॅन्ड्रॉईड ११ च्या सपोर्टसह असणारे हे टीव्ही अगदी बजेट फ्रेंडली आहेत.

वाचाः Mi 32 Inch Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, अशी ऑफर पुन्हा नाही

G-Series च्या टीव्हींमध्ये काय आहे खास?
तर आयटेल कंपनीने लॉन्च केलेल्या या नव्या G-Series टीव्हींमध्ये बिल्ट इन प्ले स्टोर, ब्लूटूथ ५.० आणि बिल्ट इन क्रोमकास्ट असे खास फीचर्स आहेत. ज्यामुळे वापरकर्ते थेट आपला फोन, लॅपटॉप किंवा टॅब्लेट टीव्हीशी कनेक्ट करुन स्ट्रीम करु शकणार आहेत. तसंच टीव्ही सोबत येणाऱ्या रिमोटमध्ये Google Assistant चं बटनही देण्यात आलं आहे.

वाचाः OnePlus Nord CE3 lite: भारीच! १०८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन तेही २० हजाराच्या आत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.