Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एप्रिलमध्ये येणार एकापेक्षा-एक दमदार स्मार्टफोन्स, वनप्लस, रिअलमी, पोकोसह विवोही उतरणार मैदानात

7

Smartphones Coming in April 2023 : आता सर्वांनाच स्मार्टफोन ही गोष्ट महत्त्वाची झाली असून त्याचा वाढता वापर आणि लोकांच्या गरजा पाहता सर्वच कंपन्या आपआपले नवनवीन फोन्स बाजारात आणत आहेत. त्यात २०२३ च्या सुरुवातीपासूनच एकापेक्षा-एक दमदार स्मार्टफोन बाजारात येत असून आता या एप्रिल महिन्यातही वनप्लस, रिअलमी, पोकोसह वीवो या कंपन्या आपआपले नवीन स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उतरवणार आहेत. तर याच प्रीमियम पण मिंड-रेंज फोन्सबद्दल जाणून घेऊ…

आसूस कंपनीचा ASUS ROG Phone 7

​आसूस कंपनीचा ASUS ROG Phone 7 हा १३ एप्रिल, २०२३ पर्यंत ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. हा खासकरुन गेमिंगसाठी बेस्ट फोन असून Qaulcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसोबत लॉन्च केला जाईल. तसंच 16GB रॅम आणि तब्बल 512GB चं इंटरनल स्टोरेज यात दिलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी या फोनची एक इमेज व्हायरल झाली होती. ज्यात दिसत होतं की फोनला RGB लाईटिंग देण्यात आली होती. तसंच याच ASUS ROG Phone 7 अपग्रेडेड व्हर्जनही लवकरच समोर होईल.

वनप्लसचा Oneplus nord CE3 lite

-oneplus-nord-ce3-lite

आता प्रीमियम स्मार्टफोन कंपनी वनप्लसने देखील त्यांचा अगदी सामान्यांच्या बजेटमधील दमदार फोन Oneplus nord CE3 lite लॉन्च केला आहे. तब्बल १०८ मेगापिक्सल इतका कॅमेरा असणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत २०,००० आहे. विशेष म्हणजे ६.७२ असा तगडा HD+ डिस्प्ले या फोनमध्ये दिला गेला आहे. याशिवाय 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 690nits चा पीक ब्राईटनेस यात दिसून येतो. फोनचा परफॉर्मन्स फास्ट आणि दमदार होण्याकरता कपनीने Qaulcomm Snapdragon 695 हा प्रोसेसर दिला असून आधुनिक 5G नेटवर्कही याला सपोर्ट करणार आहे.याशिवाय 8GB रॅमसह 256GB स्टोरेज फोनला असून विशेष म्हणजे रॅम 16GB पर्यंत वाढवता देखील येणार आहे. तसंच साइड-माउंटेड फिंगरप्रिट सेंसर अनलॉकिंग करता दिला असून 3.5mm चा युनिव्हर्सल जॅकही देण्यात आला आहे.

शाओमी कपनीचा Xiaomi 13 Ultra

-xiaomi-13-ultra

मोठ्या प्रमाणात ज्या कंपनीचे फोन भारतात वापरले जातात त्या शाओमी कपनीचा Xiaomi 13 Ultra लवकरच चीनच्या मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनच्या फिचर्सचा विचार कराल तर यात ६.९ इंचेसचा 2 Amoled डिस्प्ले दिला असून 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.. कॅमेऱ्याचं म्हणाल तर ५० मेगापिक्सल प्रायमरी, ५० मेगापिक्सलचा लायका फ्लोटिंग कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइट आणि १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स दिली गेली आहे. सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सल इतका असून बॅटरी बॅकअप म्हणाल तर 5500mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्चिंगची सुविधा देण्यात आली आहे. फोनची किंमत थोडी अधिक असून सध्या ७९,९९९ रुपये असेल अशी माहिती समोर येत आहे.

​पोको कंपनीचा POCO F5

-poco-f5

बजेट स्मार्टफोन काढण्यात पटाईत असणारी कंपनी पोको त्यांचा पोको एफ५ (POCO F5) हा फोन लवकरच लॉन्च करणार आहे. Redmi Note 12 Turbo चा रिब्रँडेड व्हर्जन म्हणून हा फोन लवकरच लॉन्च करणार आहे. हा फोन ६ एप्रिलला लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनच्या फिचर्सचा विचार कराल तर यात ६.६७ इंचेसचा QHD+Amoled डिस्प्ले दिला असून 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 1400 nits पर्यंतचा ब्राईटनेस आणि HDR10+ सपोर्ट असे फिचर्स दिले गेले आहेत. तसंच Qaulcomm Snapdragon 7+ Gen 2 चिपसेट दिला जाणा आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला असून ५०मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल असे सेंसर मिळतील. तसंच फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा देण्यात आला असून 5000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्चिंगची सुविधा देण्यात आली आहे.

VIVO कंपनीही आणणार Vivo T2 Series

vivo-vivo-t2-series

वीवोच्या या Vivo T2 सीरिजबद्दलची माहिती मागील काही काळापासून लीक होत आहे. या मालिकेत Vivo T2 5G, Vivo T2X G आणि Vivo T2 Pro 5G हे फोन लाँच केले जातील. Vivo T2 बाबत लीक होणाऱ्या माहितीतून असं दिसून आलं आहे की फोन MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसरवर आधारीत असून सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच असणार आहे. T2 मालिकेत 90Hz रिफ्रेश रेटसह LCD डिस्प्ले असेल. बॅटरीबद्दल बोलायचं झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 65W चार्जिंग सपोर्ट सारखे फीचर्स असू शकतात. तसंच फोनमध्ये किमान 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. Vivo T2 चं 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट भारतात 19,999 रुपयांना लॉन्च केले जाऊ शकते. हा फोन एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.