Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा ग्राफ घसरला; हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज फक्त २ नवे रुग्ण

15

हायलाइट्स:

  • राज्यात आज १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • दिवसभरात ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७१ हजार ५० पर्यंत आली खाली.

मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना संसर्गाचा विळखाही सैल होत चालला आहे. दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण खाली येत असून करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नवीन बाधितांचा आकडाही नियंत्रणात असून राज्यासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात आज फक्त दोन नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

वाचा:मुंबई लोकलवरील निर्बंध कसे उठणार?; सूत्र ठरलं, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

राज्यात गेल्या २४ तासांत १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता १ लाख ३३ हजार ८४५ इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे. बाकी आकडेवारीवर नजर मारल्यास आज दिवसभरात ६ हजार ६१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी त्यापेक्षा अधिक म्हणजेच ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यासोबतच राज्याचा रिकव्हरी रेट वाढून आता ९६.७२ टक्के इतका झाला आहे. करोनाचा ग्राफ खाली येत असताना अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही घटत चालली आहे. आजच्या नोंदीनुसार सध्या ७१ हजार ५० रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.

वाचा: भाजप-मनसे युतीत ‘हा’ अडथळा; पाटील-राज भेटीवर फडणवीस बोलले…

राज्यात अशी राहिली आजची स्थिती…

– राज्यात आज १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
– दिवसभरात ६ हजार ६१ नवीन रुग्णांचे निदान तर ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३९,४९३ करोना बाधित रुग्णांनी केली करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७२ % एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९३,७२,२१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४७,८२० (१२.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
– सध्या राज्यात ४,३१,५३९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,७६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
– राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७१ हजार ५० पर्यंत आली खाली.
– पुणे जिल्ह्यात १४ हजार ४२३, सांगलीत ७ हजार ७२२, साताऱ्यात ७ हजार ४९५ तर मुंबईत ४ हजार ८३६ अॅक्टिव्ह रुग्ण.
– नागपूर जिल्ह्यात आज आढळले फक्त दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण.

वाचा: मुंबईत बॉम्बची दहशत पसरवणाऱ्या कॉलचं गटारी कनेक्शन!; पोलीस हैराण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.