Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Air India Job: एअर इंडियात ३,८०० कर्मचाऱ्यांची भरती

8

महाराष्ट्र टाइम्स -वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एअर इंडियाने आपल्या पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेअंतर्गत, मागील सहा महिन्यांमध्ये तीन हजार ८०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणेही लागू केली आहेत, अशी माहिती कंपनीकडून गुरुवारी देण्यात आली.

तोट्यात असलेली एअर इंडिया कंपनी टाटा उद्योगसमूहाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात ताब्यात घेतली. कंपनीकडून माहिती तंत्रज्ञानासाठी २० कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे. त्याशिवाय, सध्याच्या विमानांचे नूतनीकरण करण्यासाठी ४० कोटींची गुंतवणूक करण्यासाठीही कंपनी वचनबद्ध आहे. कंपनीने ४७० विमानांच्या खरेदीसाठी मागणी नोंदवली आहे.

एअर इंडियाच्या परिवर्तनासाठी टाटा समूहाने ‘विहान डॉट एआय’ योजना लागू केली आहे. प्रारंभीच्या सहा महिन्यांमध्ये अनेक आघाड्यांवर प्रगती झाली असून वाढीसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीने मोठा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे, असे एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले.

एअर इंडियाने यासाठी बोईंग आणि एअरबसकडून ४७० विमाने खरेदी करण्याची ऑर्डर आधीच दिली आहे. यामध्ये ७० मोठी विमाने आहेत. यासाठी कंपनीला यावर्षी ४,२०० क्रू मेंबर्स (केबिन क्रू) आणि ९०० पायलटची गरज आहे. म्हणूनच कंपनीने भरतीसाठी रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार एअर इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.

प्रशिक्षणार्थी क्रू मेंबर्स भरती

टाटा समूहाने जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. ३६ विमाने भाडेतत्त्वावर घेण्याची कंपनीची योजना आहे. यापैकी दोन बी७७७-२०० एलआर उड्डाणे आधीच त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहेत. एअर इंडियाने फेब्रुवारीमध्ये जारी केलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये ४,२०० प्रशिक्षणार्थी क्रू मेंबर्स आणि ९०० पायलट भरती करण्याची त्यांची योजना आहे.

एअर इंडियाकडे सध्या १४० विमाने

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या संयुक्त ताफ्यात सध्या सुमारे १४० विमाने आहेत. यातील बहुतांश स्लिम बॉडी विमाने आहेत. एअरलाइनने ऑर्डर केलेल्या ४७० विमानांपैकी सुमारे ७० वाइड बॉडी आहेत तर ४०० सिंगल-आइसल विमाने आहेत. कंपनीला यावर्षी ३१ विमानांची डिलिव्हरी मिळेल, असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.