Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अरे व्वा! ५९,९९९ हजारांच्या गूगल पिक्सल 7 वर तगडी सूट, पार निम्म्या किंमतीला खरेदी करण्याची सुवर्णसंधी

6

नवी दिल्ली : Google Pixel 7 Price Drop : मार्केटमध्ये एकापेक्षा एक दमदार फिचर्स असणारे स्मार्टफोन आहेत. अनेक कंपन्या कितीतरी बजेट फोन बनवत असूनही काही प्रीमियम फोन्सची मजाच वेगळी आहे. असाच एक प्रीमियम फोन म्हणजे गूगल कंपनीचा Google Pixel 7. गूगलचे या सिरीजचे फोन 2022 च्या उत्तरार्धात भारतात दाखल झाले असून यामध्ये Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. दरम्यान Google Pixel 7 भारतात 59,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला असून या फोनवर सध्या तगडी सूट कंपनी देत आहे, त्यामुळे हा फोन विकत घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. तर Google Pixel 7 हा स्मार्टफोन सध्या Amazon India आणि Flipkart या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून तगड्या डिस्काउंटवर विकत घेतला जाऊ शकतो. तर आता या नव्या ऑफरनंतर या Google Pixel 7 ची किंमत तसंच त्याचे खास फीचर्स जाणून घेऊ…

Google Pixel 7 ची किंमत किती?
तर Google Pixel 7 स्मार्टफोनवर Amazon वरून 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घेता येईल. विशेष म्हणजे ही किंमत कोणत्याही कॅशबॅक आणि बँक ऑफरशिवाय आहे. Pixel 7 चे 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून ४९,९०० रुपयांना घेतले जाऊ शकते. याशिवाय लेमनग्रास कलर वेरिएंट ५०,९०० रुपयांना घेता येईल. हँडसेटचे स्नो कलर मॉडेल ५०,००० रुपयांना घेता येईल. तसंच नो कॉस्ट EMI वर देखील Amazon वरून हा फोन घेण्याची संधी आहे.

याशिवाय हा फोन फ्लिपकार्टवर ३००० रुपयांच्या डिस्काउंटसह ५६,९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवरून, अमेरिकन एक्सप्रेस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक कार्डसह ७००० रुपयांच्या सवलतीसह फोन विकत घेता येईल. म्हणजेच, याठिकाणीही तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तसंच तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फ्लिपकार्टवरून फोन घेतल्यास तुम्हाला ३०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे या सगळ्या ऑफरनंतर अगदी निम्म्या किंमतीला हा फोन मिळू शकतो.

वाचाः मस्तच! अँड्रॉईडमध्ये येणार आयफोनसारखा फील, Whatsapp मध्ये होतोय हा मोठा बदल

कसा आहे Google Pixel 7?
तर Google Pixel 7 स्मार्टफोन हा खासकरुन सर्वोत्तम कॅमेरा आणि सॉफ्टवेअर अनुभवासाठी ओळखला जातो. Pixel 7 फोनमध्ये मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी आणि 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा असे कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनमध्ये मॅजिक इरेजर, रिअल टोन, मोशले ब्लर यासारखे काही उत्कृष्ट कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कॅमेरा 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. फोनच्या सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर Pixel 7 स्मार्टफोनमध्ये Android 13 OS उपलब्ध आहे.
Google फोन असल्याने, फोनला आधी Android 14 अपडेट मिळेल. दरम्यान Google नवीन Android OS मे 2023 मध्ये I/O 2023 इव्हेंटमध्ये लॉन्च करेल. कंपनी या इव्हेंटमध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टमची वैशिष्ट्ये देखील सांगणार आहे. दरम्यान हे सारे अपडेट्स आधीच या गूगल फोनमध्येच येणार आहेत. याशिवाय Pixel 7 स्मार्टफोनमध्ये Google Tensor G2 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मेटल बॉडीचा बनलेला आहे आणि डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. या फोनसाठी सुंदर अशा ग्लास बॉडीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय Pixel 7 फोनमध्ये 4355mAh बॅटरी देण्यात आली असून ती 30W चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येत असल्याने अगदी काही वेळातच बॅटरी पूर्ण दिवसभराच्या वापरासाठी चार्ज होऊ शकते.

वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.