Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

SBI मध्ये अकाऊंट आहे? आता फक्त SMS किंवा मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स, स्टेटमेंट जाणून घ्या, वाचा कसं?

6

नवी दिल्ली:SBI Banking : भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक असणारी एक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). आता इतर बँकांप्रमाणे एसबीआय देखील इंटरनेट बँकिंगची सेवा पुरवत असून आता तर फक्त मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारे अकाऊंट बॅलेन्स किंवा मिनी स्टेटमेंट पाहता येणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून मिस्ड कॉल देऊन त्यांचे खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि बरेच काही तपासता येणार आहे.एसबीआय क्विक मिस्ड कॉल बँकिंग सेवा या नावाने ओळखल्या जाणार्‍या फीचरमध्ये, ग्राहक मिस्ड कॉल देऊन किंवा पूर्वनिर्धारित नंबरवर पूर्वनिर्धारित कीवर्डसह एसएमएस पाठवून या वैशिष्ट्याद्वारे बँकिंग सेवांचा वापर करु शकतात. तर या एसबीआयच्या नव्या फीचर्सबद्दल आणखी जाणून घेऊ…

SBI Quick ही एक मिस्ड कॉल बँकिंग सेवा आहे जी SBI खातेधारकांना नोंदणी, अकाऊंट बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट, ATM कार्ड ब्लॉक करणे, कार लोनची माहिती आणि PM सामाजिक सुरक्षा योजनां यासह अनेक सुविधा पुरवते. ग्राहक या सर्व्हिसच्या मदतीने त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती प्राप्त करू शकतात. तसंच गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्जाचे व्याज प्रमाणपत्र ईमेलद्वारे मिळवू शकतात. इतर फीचर्समध्ये एटीएम कार्ड ऑन/ऑफ, ग्रीन पिन जनरेशन आणि योनो डाउनलोड सुविधा यांचा समावेश आहे.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

SBI क्विक मिस्ड कॉल बँकिंगसाठी नोंदणी कशी कराल:

एसबीआय क्विक मिस्ड कॉल बँकिंग सेवा वापरण्यासाठी एसबीआय ग्राहकांना एकदाच नोंदणी करणे आवश्यक आहे. सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी त्या खात्यासाठी बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 09223488888 वर ‘REG account number’ चा एसएमएस पाठवा. उदाहरणार्थ, तुमचा खाते क्रमांक 12345678901 असल्यास, तुम्ही ‘REG 12345678901’ असा SMS पाठवाल.

शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि बरेच काही कसे तपासाल
SBI क्विक मिस्ड कॉल बँकिंगमुळे ग्राहकांना त्यांची शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि बरंच काही एका मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे मिळू शकते. यावेळी शिल्लक तपासण्यासाठी मिस्ड कॉल द्या किंवा 09223766666 वर “BAL” असं लिहून एसएमएस पाठवा. याशिवाय मिनी स्टेटमेंट मिळविण्यासाठी, मिस्ड कॉल द्या किंवा 9223866666 वर “MSTMT” मजकूरासह एसएमएस पाठवा.

ATM कार्ड ब्लॉक करण्यासाठी
तुम्हाला तुमचे ATM कार्ड ब्लॉक करायचे असल्यास, तुम्ही 567676 वर “BlockXXXX” या मजकुरासह एसएमएस पाठवून हे करू शकता, जिथे XXXX तुमच्या कार्ड क्रमांकाचे शेवटचे 4 अंक असतील.

कार किंवा होम लोन
कार किंवा होम लोनबद्दल चौकशी करण्यासाठी 567676 किंवा 09223588888 वर “कार” किंवा “होम” मजकूरासह एसएमएस पाठवा.

सेवांची संपूर्ण यादी हवी असल्यास
SBI क्विक मिस्ड कॉल बँकिंगद्वारे उपलब्ध सेवांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी, 09223588888 वर “HOME” मजकूरासह एसएमएस पाठवा. या सेवा वापरताना तुमच्या खात्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरच वापरावा लागेल.

वाचा: कमी बजेटमध्ये स्मार्टफोन हवाय? टेन्शन नाही, १० हजार रुपयांच्या आत आहेत हे ५ बेस्ट स्मार्टफोन्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.