Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकच नंबर! ७५ इंचाच्या टीव्हीवर मिळवू शकता ६५ हजारांची सूट, काय आहे ऑफर?

9

नवी दिल्ली : MI 75 Inch Tv : आजकाल लोकांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण भारी लाईफ जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे घरातील गॅजेट्सही तसेच भारी असावे असं प्रत्येकाला वाटतं. त्यात घरात सर्वात वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे टीव्ही हा मोठा आणि दमदार असावा असं अनेकांना वाटतं. आता तुम्हालाही जर घरात एक मोठा डिस्प्ले असणारा जबरदस्त टीव्ही हवा असेल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर शाओमी कंपनीनं आणली आहे. सध्या शाओमी कंपनीचा फॅन फेस्टीव्हल २०२३ हा सेल सुरु असून यामध्ये ७५ इंचाच्या Mi QLED TV वर तब्बल ६५ हजारांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. या टीव्हीची खरी किंमत १, ९९, ९९९ रुपये असून आता या सेलमध्ये हा टीव्ही १, ३४, ९९९ रुपयांना मिळत आहे. याशिवाय हा टीव्ही विकत घेण्यासाठी तुम्ही ICICI बँकेचं कार्ड वापरल्यास आणखी १ हजार रुपयांचं इस्टंट डिस्काऊंटही तुम्हाला मिळू शकतं. तर ICICI च्या नेटबॅकिंगवर २ हजार रुपयाचं डिस्काऊंट मिळू शकतं. तसंच Reward Mi कूपनच्या मदतीनं तुम्हाला ३ हजार रुपयांचं अॅडिशनल डिस्काऊंटही मिळू शकतं.

काय आहेत फीचर्स?
आता या टीव्हीच्या फीचर्सचं म्हणाल तर टीव्हीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा डिस्प्ले. या टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सल रेज्यूलेशनसह 4K डिस्प्ले दिला गेला आहे. तसंच या डिस्प्लेचा रिएलिटी फ्लो 120Hz इतका देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये असणारं विविड पिक्चर इंजिन टीव्हीच्या डिस्प्लेला आणखी खास बनवतं. हा टीव्ही 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह येतो. तसंच प्रोसेसर म्हणाल तर या टीव्हीमध्ये Mali G52 MP2 हा 64 बिटचा क्वॉड कोर A55 CPU दिला गेला आहे.

तसंच दमदार साऊंडसाठी यामध्ये 30W चे स्पीकर दिले गेले आहेत. तसंच दोन ट्वीटरसह दोन फुल रेंज ड्रायव्हर आणि दोन वूफर ड्रायव्हर देण्यात आले आहेत. साऊंड क्वॉलिटी आणखी भारी बनवण्यासाठी डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस एचडी ही फीचरही देण्यात आलं आहे. याशिवाय गूगल असिस्टंट आणि बिल्ट इन क्रोमकास्टसह टीव्हीमध्ये अॅन्ड्रॉईड १० ओएस देण्यात आला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी ड्यूल बँड WiFi 802. 11a/b/g/n/ac (2×2 MIMO), HDMI 2.1, eARC, ब्लूटूथ 5.0, तीन HDMI 2.1, दोन यूएसबी पोर्ट, एक ऑप्टिकल आणि एक एवी इनपुट असे ऑप्शन दिले गेले आहेत.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.