Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

AI Tools: आता सर्दी-तापाचं कारण देऊन सुट्टी घेणं पडणार महागात, AI टूल खरं खरं सांगणार

14

नवी दिल्ली : Artificial Intelligence: सध्याच्या या डिजीटल युगाल तंत्रज्ञानात रोज नव-नवे शोध लागत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देखील इतकी प्रगती केली आहे की, अनेक गोष्टी ऑटोमेटिक आपल्याला उपलब्ध होत असतात. आता हेच पाहा, चॅट जीपीटी या प्रणालीनं मागील काही दिवसांत सर्वांनाच हैराण केलं आहे. म्हणजे या ऑनलाईन सॉफ्टवेअरला तुम्ही कोणतीही माहिती विचारा, ऑनलाईन करायचे कोणतेही टास्क सांगा तुम्हाला अप्रतिम रिजल्ट मिळतो. एखाद्या रोबोटप्रमाणे काम करणाऱ्या या दमदार प्रणालीनंतर आता आणखी एक नव्या प्रकारची आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे.या नव्या तंत्रज्ञानानुसार आता केवळ तुमच्या आवाजावरून हे कळणार आहे की तुम्हाला खरंच सर्दी झालीय की नाही. कारण अनेकदा ऑफिसमध्ये लोक खोटं बोलून रजा घेतात ही गोष्ट तुम्हीही पाहिली असेल पण याच सर्वांवर आळा घालण्यासाठी ही अफलातून प्रणाली आता आणली जात आहे. सध्या या एआय टूलवर काम केले जात आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सूरत येथील काही संशोधकांनी 630 लोकांच्या आवाजाच्या नमुन्यांचा अभ्यास केला, त्यापैकी 111 लोकांना सर्दी झाल्याचे आढळून आले. सामान्य सर्दीबद्दल माहिती व्हावी म्हणून या लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीचे विश्लेषण ही करण्यात आले. अभ्यासात हार्मोनिक्स म्हणजेच स्वर लय वापरण्यात आली. कारण जेव्हा एखाद्या व्यक्ती सर्दी-खोकल्याने त्रस्त होते तेव्हा त्या व्यक्तीची आवाजाची पद्धतही बदलते. पण केवळ आवाज ऐकून नेमकं सांगता येणार नाही, त्यामुळे संशोधकांनी मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने लोकांच्या आवाजावरुन त्यांना सर्दी झालीये का नाही हे तपासण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

वाचा: अखेर तो दिवस उजाडणार! देशातील ॲपलचं पहिलं रिटेल स्टोअर मुंबईत ‘या’ दिवशी उघडणार

कशी करण्यात आली चाचणी?
या चाचणी दरम्यान, लोकांना १ ते ४० पर्यंत मोजण्यास आणि तसंच ‘द नॉर्थ विंड अँड द सन’ ही कथा वाचण्यास सांगितले होते. या अभ्यासात सुमारे 70% अचूकता दिसून आली. अभ्यासाचा एकमेव उद्देश डॉक्टरांकडे न जाता लोकांमध्ये सामान्य सर्दी आहे का? हे शोधणं हा होता. बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असेही म्हटले आहे की हा अभ्यास व्यवसाय मालकांसाठी खूप फायद्याचा ठरु शकतो.

वाचा: iPhone 15 Pro : नवा आयफोन ठरणार गेम चेंजर, ‘या’ फीचर्सनी वाढवली चाहत्यांची उत्सूकता

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.