Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Tecno Phantom V Fold फोनची स्पर्धा OPPO Find N2 Flip शी होईल. टेक्नोचा हा नवीन फोन ओप्पोच्या फोल्डेबल फोनपेक्षा अनेक गोष्टीत खास आहे. या फोनमध्ये ७.५ इंचाची मेन स्क्रीन मिळते. ज्यात 120hz चा रिफ्रेश रेटचा सपोर्ट करतो. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा मिळतो. फ्रंट मध्ये दोन कॅमेरा मिळतात. ज्यात मेन स्क्रीनवर १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सब स्क्रीनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९००० प्लस चिपसेट वर काम करते. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते. सोबत ४५ वॉट फास्ट चार्जिंग दिली आहे.
वाचाः Tips to spot farzi note : तुमच्या खिशातील नोट खरी का ‘फर्जी’, कशी ओळखाल? या सोप्या टीप्स करा
Fantom V Fold 5G मध्ये ७.८५ 2K+ एलटीपीओ डिस्प्ले दिला आहे. याची किंमत ८८ हजार ८८८ रुपये आहे. परंतु, सुरुवाती डिस्काउंट ऑफर मध्ये या फोनला फक्त ७७ हजार ७७७ रुपये किंमतीत खरेदीची संधी आहे. फोनला अमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकते. या फोनचा सेल आजपासून म्हणजेच १२ एप्रिल पासून सुरू होत आहे. तर रिटेल प्री बुकिंग आकर्षक लाँच ऑफर्स सोबत २२ एप्रिल पासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये ५ हजार रुपयाचे गिफ्ट फ्री दिले जाणार आहे. फोनच्या खरेदीवर ८ हजार ८८८ रुपये किंमतीचे फ्री सुरक्षा प्लान दिले जाणार आहे. यात ग्राहकांना ६ महिन्यासाठी फ्री वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि पिक अप एन्ड ड्रॉप सेवा १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय, एचडीबी फायनान्शियल सर्विस सोबत ५ हजार रुपयाचा कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
वाचाः फक्त २ हजार रुपयांमध्ये विकत घेऊ शकता ३९ हजार वाला Oppo Reno 8 5G, काय आहे खास ऑफर?