Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mobile Phone Care : आताच सावध व्हा! सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज केलात तर होईल मोठा तोटा

22

नवी दिल्ली :Don’t Use Public Chargers : तुम्ही कधीही मॉल्स, मार्केट किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी तुमचा फोन चार्जिंगला लावला आहे का? जर होय, तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अशाप्रकारे जर तुम्ही फोन कुठेही चार्जला लावत असाल तर ते तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. FBI ने अलीकडेच संभाव्य हॅकिंगच्या जोखमींबद्दल माहिती देताना चिंता व्यक्त केली आहे. यूएस मधील वापरकर्त्यांना मॉल्स आणि मार्केट सारख्या ठिकाणी मिळणारे सार्वजनिक चार्जर वापरण्याऐवजी पॉवर बँक घेऊन जाण्याचा सल्ला दिला गेला आहे. FBI च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर विमानतळ, हॉटेल्स किंवा शॉपिंग सेंटर्समध्ये मोफत चार्जिंग स्टेशन्स वापरणे टाळा. यामुळे युजर्सच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर (एक प्रकारचा व्हायरस) किंवा स्पायिंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जाते. ज्यामुळे तुमचा फोन खराब होईलच शिवाय तुमचा सर्व डेटाही चोरीला जाऊ शकतो.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

सायबर सुरक्षा तज्ञांनी एक चेतावणी देखील जारी केली आहे की सायबर गुन्हेगार सार्वजनिक USB चार्जिंग स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी डिव्हाइसमध्ये मालवेअर इंजेक्ट करतात. युजर्स सार्वजनिक USB पोर्ट वापरत असल्यास, मालवेअर डिव्हाइस लॉक करू शकतो किंवा पर्सनल डेटा आणि पासवर्ड थेट सायबर गुन्हेगारांना पाठवू शकतो.

ज्यूस जॅकिंग

ज्यूस जॅकिंग ही एक पद्धत आहे जी हॅकर्स खूप वापरतात. 2021 मध्येही अशी प्रकरणे समोर आली होती. हॅकर्स सार्वजनिक ठिकाणी जसे की विमानतळ आणि खरेदी केंद्रांवर सार्वजनिक USB पोर्टद्वारे वापरकर्त्यांच्या उपकरणांमध्ये मालवेअर इंजेक्ट करतात. तुम्हीही जॅकिंगचा बळी होऊ नये म्हणून, सार्वजनिक ठिकाणी तुमची डिव्हाइस चार्ज करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. वापरकर्त्यांनी फक्त स्वतःचा चार्जर किंवा USB केबल वापरावी. सार्वजनिक USB पोर्ट वापरत असल्यास, डेटा ब्लॉकर वापरा किंवा संवेदनशील माहिती नसलेले डिव्हाइसच केवळ चार्ज करा.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.