Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वरुथिनी एकादशी तिथी शुभ मुहूर्त, कथा, महत्व आणि इतर मान्यता

9

हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते. चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात झाली असून, चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्रीविष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते.वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरुथिन शब्दापासून आला असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक असा होतो. वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्रीविष्णूंचे संरक्षण, कवच मिळते, अशी मान्यता आहे. वरुथिनी एकादशीला श्रीविष्णूंची पूजा करावी. यावेळी विष्णूसहस्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते. या व्रतामध्ये श्रीविष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्यांचे स्मरण करावे. या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा, असे सांगितले जाते. यंदा वरुथिनी एकादशी रविवार १६ एप्रिल २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे.

वरुथिनी एकादशीचा मुहूर्तः

चैत्र कृष्ण एकादशी प्रारंभः १५ एप्रिल २०२३ रात्री ८ वाजून ४६ मिनिटे

चैत्र कृष्ण एकादशी समाप्तीः १६ एप्रिल २०२३ सायं ६ वाजून १५ मिनिटे

वरुथिनी एकादशी महत्व

या एकादशीला केलेले व्रत मोक्षदायक मानले जाते. यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरूथिनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंधाता स्वर्गात पोहचले होते. वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षापर्यंत तप करण्यासमान आहे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मण स्वर्णदान केल्याचे जे फळ असते, ते फळ वरूथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते. वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. या एकादशीचे व्रत गंगा स्नानच्या फळापासून देखील अधिक आहे, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते.

वरुथिनी एकादशी कथा

प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मान्धाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता. दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला. तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला. तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंना प्रार्थना केली.

तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला, परंतू तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता. याने राजा मान्धाता खूप दु:खी झाले. श्री हरींनी त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि त्यांना म्हटले पवित्र नगरी मथुरेस जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करा आणि वरूथिनी एकादशी व्रत करण्यास सांगितले. या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले.
प्रभू श्रीहरी विष्णुंच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरेला पोहचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले ज्यामुळे त्यांना त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला. या व्रताची कथा आणि महत्व अर्जुनाच्या विनंतीवर स्वत: श्री कृष्णांनी सांगितले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.