Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 13 वर बंपर सूट, तब्बल ३९,००० रुपयांपर्यंत वाचवू शकता, वाचा नेमकी ऑफर काय?

14

Apple iPhone 13 discount : तुम्हीही जर आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण कंपनी त्यांचा प्रीमियम मॉडेल आयफोन १३ (iPhone 13) मोठं डिस्काउंट देत आहे. या मॉडेलवर सध्या सुरु असणाऱ्या खास ऑफर्समुळे हा फोन जवळपास ३९ हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार आहे.
तर ही खास ऑफर प्रसिद्ध इकॉमर्स साईट फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवर तुम्हाला iPhone 13 अगदी स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. आता ३९ हजारांचा नेमकं डिस्काउंट कसं मिळू शकेल ते पाहू… तर आता सध्या iPhone 14 हा लेटेस्ट आयफोन असल्याने iPhone 13 ची किंमत तशी कमी झाली आहे. त्यात कॅशबॅक, एक्सचेंजमुळे हा फोन अधिकच स्वस्त मिळू शकतो.

कशी मिळवाल सूट?

सध्या भारतात iPhone 13 चा 128GB हा व्हेरियंट ६९,९०० रुपयांना आहे. पण फ्लिपकार्टलक ९ टक्के डिस्काउंटनंतर हा फोन थेट ६२,९९९ रुपयांना मिळत आहे. त्यात जर तुम्ही HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड वापराल तर EMI ट्रान्झकेशनवर आणखी २००० ऑफ होतील. तसंच Flipkart axis band card चा वापर करुन ५ टक्के कॅशबॅक मिळवू शकता. तसंच जर तुम्ही नवा फोन घेताना जुना फोन एक्सचेंज करत असाल तर तब्बल ३० हजारांपर्यंतची सूट मिळू शकते. पण या एक्सचेंज ऑफरमध्ये तुमच्या फोनच्या कंडीशनवर तुम्हाला नेमकी सूट किती हे कळणार आहे. जर तुमचा फोन पूर्णपणे सुस्थितीत असेल तरच ३० हजारांपर्यंत सूट मिळेल अन्यथा फोनच्या कंडीशनुसार किंमतही कमी होणार आहे.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 13 हा एका ६.१ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्लेसह असणारा फोन आहे. या फोनमध्ये हॅप्टिक टचसह 1200nits चा पीक ब्राईटनेस मिळतो. दमदार परफॉर्मेंससाठी यामध्ये A15 Bionic Chip देण्यात आली आहे. तसंच यामध्ये लेटेस्ट ios 16 चे अपडेट्स देखील देण्यात आला आहे. रिअर पॅनलवर 12MP वाइड आणि 12MP अल्ट्रा वाइड सेंसरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. iPhone 13 मध्ये सेल्फी कॅमेराही 12MP चा आहे. तसंच बॅटरी बॅकअपही चांगलं असून विशेष म्हणजे हा फोन 5G सपोर्टेड आहे.

वाचा :Twitter Blue Tick : ‘या’ दिवसापासून हटवले जाणार सर्व जुने ब्लू टिक, एलन मस्कचं ट्वीट पाहिलं का?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.