Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
१९९ चा एअरटेल रिचार्ज
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 3GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला ३०० एसएमएस देखील मिळतात, त्यापैकी १०० एसएमएस रोज पाठवले जाऊ शकतात. या प्लॅनची मर्यादा ३० दिवस इतकी आहे. दरम्यान 3GB डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना प्रति एमबी 50 पैसे आकारले जाणार आहेत. प्लॅनमध्ये विंक म्युझिकची मोफत सदस्यता देखील उपलब्ध आहे.
२९६ चा एअरटेल रिचार्ज
या रिचार्जच्या फायद्यांचं म्हणाल तर अमर्यादित कॉलिंग, 25GB डेटा, दिवसाला १०० SMS/दिवस, प्राइम व्हिडिओ मोबाइल कॉपीचं फ्री ट्रायल, Wynk म्युझिक सबस्क्रिप्शन, मोफत Hello Tunes, FASTag वर १०० रुपये कॅशबॅक आणि ३ हिन्यांचे अपोलो सबस्क्रिप्शन यांचा समावेश आहे. २९६ रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.
४५५ चा एअरटेल रिचार्ज योजना
जर तुम्ही डेटापेक्षा जास्त व्हॉइस कॉल करण्यास प्राधान्य देत असाल, तर एअरटेलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान तुमच्यासाठीच आहे. ४५५ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी 6GB डेटा मिळतो. देशभरातील प्रत्येक नेटवर्कवर कॉल करणं या प्लॅनमध्ये सर्वांसाठी विनामूल्य असेल आणि तुम्ही दररोज १०० एसएमएस देखील मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. याशिवाय मोफत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकचे सदस्यत्वही या प्लॅनमध्ये कंपनी देत आहे.
Airtel चा दमदार ३६५ दिवसांसाठीचा प्लॅन
तर एअरटेलचा ३३५९ रुपयांचा नवीन फ्लॅगशिप रिचार्ज प्लॅन ३६५ दिवसांच्या दमदार वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळणार आहे. तसंच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. OTT फायद्यांव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी Disney + Hotstar मोबाइल सपोर्टसह येते. याशिवाय Apollo 24/7 सर्कल, Fastag वर 100 रुपये कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि WYNK म्युझिक देखील या एअरटेल रिचार्ज प्लॅन 2023 मध्ये उपलब्ध आहेत.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?