Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मंदिरा बेदीचा जन्म १५ एप्रिल १९७२ रोजी कोलकाता येथे झाला. मंदिराच्या वडिलांचे नाव विरेंद्र सिंह बेदी आणि आईचे नाव गीता बेदी आहे. मंदिराला एक मोठा भाऊ असून तो बँके इन्व्हेस्टर म्हणून काम करतो. मंदिराने तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या ‘कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल’मधून पूर्ण केले.
मंदिराने ‘सेंट झेवियर्स कॉलेज’, मुंबईतून अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली आणि ‘सोफिस पॉलिटेक इन्स्टिट्यूट’मधून मीडियामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मंदिराने काही सकारात्मक आणि काही नकारात्मक भूमिका साकारल्या.
मंदिराने १९९४ मध्ये हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. दूरदर्शनवरील ‘शांती’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेती ‘शांती’ नावाचे पात्र तिने साकारले होते. यानंतर ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘सीआयडी’, ‘२४’ आणि इतर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
चित्रपटांबाबतीत सांगायचे तर १९९५ मध्ये आलेल्या ‘डी. डी.एल. जे.’ म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातून तिने पदार्पण केले. याव्यतिरिक्त तिने ‘बादल’, ‘शादी के लड्डू’, ‘ओ तेरी’, ‘वोडका डायरीज’ या चित्रपटांमध्येही काम केले.
ती अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर होस्टिंग करतानाही दिसते. या सर्वांशिवाय मंदिरा एक चांगली फॅशन डिझायनर देखील आहे.
मंदिरा बेदीने आयसीसी विश्वचषक २००३ आणि २००७ सोबतच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००४ आणि २००६ होस्ट केली आहे. आयपीएल २००९ मध्येही ती होस्ट बनली होती.