Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

cm on restaurants: धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल्स कधी सुरू होणार?; मुख्यमंत्री म्हणाले…

15

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार टास्क फोर्सची बैठक.
  • या बैठकीत राज्यातील करोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेणार.
  • राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतचा निर्णय लवकरच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून लोकससेवा सुरू करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा दिला असता, तरी देखील अजूनही हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी उद्या टास्क फोर्सची बैठक बोलावली असून या मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या संदर्भात निर्णय जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. (big statement by cm uddhav thackeray regarding opening of religious places hotels restaurants malls)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. उद्या टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यातील करोना स्थितीची आढावा घेतल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्याचा विचार केला जाणार असून त्यानंतर धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, यात ८ ते १० दिवस जातील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईकरांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोनाची स्थिती आटोक्यात आली असली, तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढताना दिसत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावरून या जिल्ह्यांमध्ये शिथिल मिळणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना दिले आहेत. तसेच उद्यापासून काही ठिकाणी शिथिलता देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री Live: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…

‘करोनाचे नियम पाळावेच लागतील’

करोनाचा संसर्ग थोपवायचा असेल तर करोनाविषयक नियम हे पाळावेच लागतील. जो पर्यंत ठराविक टप्प्यापर्यंत लसीकरण होत नाही, तो पर्यंत नियम पाळावे लागणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता, हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.