Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus चा ४० इंचांचा टीव्ही फक्त १०,९९९ रुपयांना, वाचा कसा कराल ऑनलाईन ऑर्डर

32

नवी दिल्ली :OnePlus Smart TV Discount : मोबाईल फोन्ससाठी प्रसिद्ध असणारी कंपनी वनप्लस आजकाल स्मार्ट टीव्हीही तयार करत आहे. या कंपनीचे स्मार्ट टीव्ही सामन्यांना परवडणार असून आता एका मॉडेलवर तर भारी सूट मिळत आहे. वनप्लसच्या ४० इंचाचा Y1S स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे. हा ४० इंचाचा स्मार्ट टीव्ही डिस्काउंटनंतर तुम्हाला १०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तर OnePlus च्या ४० इंची स्मार्ट टीव्हीची किंमत सुमारे २९,९९९ रुपये आहे. परंतु बँक आणि इतर डिस्काउंट ऑफरसह, टीव्ही फक्त १०,९९९रुपयांमध्ये खरेदी करता येईल.तर OnePlus TV 40Y1S स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत सुमारे २९,९९९ रुपये आहे. पण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म साइट फ्लिपकार्टवर हा टीव्ही २१,९९९ रुपयांच्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोनच्या खरेदीवर १०,९९९ रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर टीव्हीची किंमत १०,९९९ रुपये होत आहे. हा टीव्ही OnePlus.com, Amazon आणि Flipkart या विविध साईट्सवरुनही खरेदी करता येईल. त्याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्रोमावर स्मार्ट टीव्ही १८,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ICICI बँकेच्या ऑफरमध्ये या टीव्हीवर १५०० रुपयांची सूट दिली जात आहे.

OnePlus TV 40 Y1S चे फीचर्स

OnePlus TV 40 Y1S स्मार्ट टीव्हीमध्ये ४० इंचाची स्क्रीन आहे. यामध्ये Full HD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1920×1080 आहे. टीव्हीमध्ये HDR 10, HDR10+ आणि HLG सपोर्ट देण्यात आला आहे. TV मध्ये Quad core MediaTek MT9216 चिपसेट देण्यात आला आहे. यात 1GB रॅम आणि 8GB अंतर्गत स्टोरेज सपोर्ट आहे. टीव्ही Android TV 11 सह OxygenPlay 2.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झाल्यास, फोनमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, डेटा सेव्हर, बिल्ड-इन क्रोकास्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट आणि दोन USB टाइप-सी पोर्ट आहेत. यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि गुगल असिस्टंट सपोर्ट आहे.

वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.