Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

63

नवी दिल्ली :Netflix, Amazon Prime Video : आता अधिकतर लोक हे सिनेमा पाहण्याची मजा OTT प्लॅटफॉर्मवर घरबसल्याचं घेणं पसंत करतात. कारण आजकाल बरेच सिनेमे हे OTT वरच रिलीज होत असतात. तसंच एकापेक्षा एक वेब सिरीजही OTT वर रिलीज होत आहेत. त्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्नी + हॉटस्टार सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना वेब सीरिज, चित्रपटांसह स्पोर्ट्स इव्हेंट यांसारखी सर्वप्रकारची एन्टरटेंनमेंट मिळते. तर तुम्हालाही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टार यापैकी कोणतं सब्सक्रिप्शन घ्यायचं असल्यास त्यांच्याा सर्व प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ…

Netflix OTT सब्सक्रिप्शन
Netflix हे जगातील सर्वात लोकप्रिय OTT अॅप्सपैकी एक आहे. नेटफ्लिक्स केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. Netflix वर, तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये, श्रेणींमध्ये सिनेमे, वेबसिरीज पाहू शकता. वापरकर्त्यांना Netflix Originals असे वेगवेगळे सिनेमे, शो पाहायला मिळतात जे इतर कुठेही त्यांना पाहता येणार नाहीत. Netflix च्या एकूण चार मासिक योजना आहेत ज्यात सदस्यांना विविध फायदे दिले जातात. Netflix च्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत १४९ रुपये आहे. एका महिन्याच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये, एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर सिनेमे, वेब सिरीज पाहण्याची अॅक्सेस दिली जाते. याशिवाय, १९९ रुपयांच्या प्लॅनमध्येही नेटफ्लिक्सच्या ग्राहकांना १४९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व फीचर्स मिळतात. पण त्यात पिक्चर क्वालिटी अधिक चांगली असते.त्यानंतर Netflix च्या ४९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झाल्यास, ग्राहक एकाच वेळी दोन डिव्हाईसवर अॅक्सेस मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये अमर्यादित चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाइल गेम्स देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनसह, वापरकर्ते फुलएचडीमध्ये सामग्री पाहू शकतात. त्यानंतर येतो तो ६४९ रुपयांचा नेटफ्लिक्स प्लॅन. यामध्ये वापरकर्ते एकाच वेळी ४ डिव्हाईसेसवर कंटेंट पाहू शकतात. या प्लॅनमध्ये अल्ट्रा एचडी पिक्चर क्वालिटी कंटेंट उपलब्ध आहे.

Disney+ Hotstar OTT सब्सक्रिप्शन
डिस्नी + हॉटस्टार हे देखील एक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे. हॉटस्टार हे देशातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. हॉटस्टारचे देशात १०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. हॉटस्टारवर अनेक प्रकारचे शो, चित्रपट आणि स्पोर्ट इव्हेंट्स असा विविध प्रकारचा कंटेट उपलब्ध आहे. डिस्नी + हॉटस्टार सह, युजर्सना स्टार, एचबीओ, स्टार वर्ल्ड, स्टार प्लस इत्यादी टीव्ही चॅनेल्सची देखील मजा घेता येते. Disney + Hotstar च्या 1-महिन्याच्या प्लॅनची किंमत २९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, स्पेशल शो इत्यादी कंटेट पाहिला जाऊ शकतो. युजर्स मोबाइल, टीव्ही, लॅपटॉपसह ४ स्क्रीनवर कंटेट पाहू शकतात. या प्लॅनमध्ये डॉल्बी 5.1 ऑडिओ सपोर्टसह 4K (2160p) क्वॉलीटीमध्ये कंटेट पाहता येतो. त्याशिवाय ८९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १ वर्षांची आहे. वापरकर्ते एकाच वेळी दोन डिव्हाईसमध्ये टीव्ही किंवा लॅपटॉप, फोनवर फुलएचडी क्वॉलिटीत शो पाहता येतात. Disney + Hotstar च्या १४९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १ वर्षाची आहे. या प्लॅनमध्ये, ग्राहक एकाच वेळी 4K क्वॉलीटीत टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइल यांसारख्या ४ डिव्हाईसवर चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, स्पेशल वॉच यासारखे शो पाहू शकतात.

Amazon Prime Video OTT सब्सक्रिप्शन
ॲमेझॉन कंपनीचंही स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video हे आहे. यावर अनेक प्रकारचे, भाषांचे चित्रपट आणि टीव्ही शो उपलब्ध आहेत. प्राइम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर भारतीय शो आणि विविध टीव्ही मालिकाही उपलब्ध आहे. यामध्ये १७९ रुपयांच्या Amazon प्राइम मंथली प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक सुविधा मिळतात. ॲमेझॉनच्या साईटवर एक-दोन दिवसांत डिलिव्हरी, Amazon प्राइम व्हिडिओ, तसंच प्राइम म्युझिक हे सगळे लाभ मिळतात. या प्लॅनची वैधता एक महिना असते. तसंच यातील ४५९ रुपयांच्या प्लॅनची वैधता तीन महिने आणि ५९९ रुपयांचा प्लॅन ६ तर १४९९ प्लॅनची वैधता १ वर्ष इतकी आहे.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.