Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किती आहे ‘भोला’चे कलेक्शन?
अजयचा ‘भोला’ सिनेमा तामिळ फिल्म ‘कैथी’चा रीमेक आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. मात्र सिनेमा अगदीच फ्लॉप ठरलेला नाही. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘भोला’ समोर कोणताही मोठा चित्रपट नाही. अशा परिस्थितीत स्पर्धेअभावी चित्रपटगृहांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रेक्षकांना फारसे पर्याय नाहीत. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या रिपोर्टनुसार, ‘भोला’ने १६ दिवसांत ७०.८७ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. चांगली गोष्ट म्हणजे शनिवार आणि रविवारी वीकेंड असल्याने चित्रपटाच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या शुक्रवारच्या तुलनेत ५० टक्के घटली कमाई
गेल्या शुक्रवारच्या तुलनेत भोलाच्या कमाईत ५०% घट झाली आहे. ‘भोला’ ३० जानेवारीला रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची ओपनिंग फारशी चांगली झाली नाही. दरम्यान तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईची दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारशी तुलना केली तर चित्रपटाच्या कमाईत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून चित्रपटाची कमाई कोटींवरून लाखांवर येऊ शकते. मात्र बॉक्स ऑफिसवर कोणत्याही चित्रपटाची स्पर्धा सध्या ‘भोला’सोबत नसल्याने हा सिनेमा ८० कोटींचा टप्पा गाठू शकतो. असे झाल्यास भोला ‘विक्रम वेधा’ (७९ कोटी) आणि ‘जुग जुग जियो’चे (७८ कोटी) मागे टाकेल. मात्र आगामी काळात सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल याची शक्यता फारच धूसर आहे.
आता ‘किसी का भाई किसी की जान’कडून आहेत अपेक्षा
रमजान महिन्यामुळे ‘भोला’चे सर्वाधिक नुकसान झाले. रोजे असल्याने सिनेमाचा मोठा प्रेक्षकवर्ग थिएटरपासून दूर आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश-बिहार सोडल्यास सिनेमाची चांगली कमाई झाली नाही. आता बॉक्स ऑफिसच्या सर्व आशा आता २१ जूनकडे लागल्या आहेत. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार असून बॉक्स ऑफिसला तेव्हा चांगले दिवस येण्याची आशा आहे.
विद्यापीठात नाही शिकलात आणि थेट जगण्याला भिडलात तरी तुम्ही पारंगत होता | नागराज मंजुळे