Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Netflix Down : नेटफ्लिक्सचं सर्व्हर डाऊन! वेबसाईट उघडत नसल्यानं युजर्स वैतागले

29

नवी दिल्ली :Netflix Down in US: सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) डाउन झाल्यानं बऱ्याच युजर्सना त्रास सहन करावा लागला. दरम्यान नेटफ्लिक्सचा हा प्रॉब्लेम सध्यातरी युएस अर्थात अमेरिकेतील यूजर्सना आला. तेथील नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना मोबाइल ॲप तसंच साइटवरही समस्या येत आहेत. त्यामुळे ट्विटरवरही युजर्स तक्रारी करत असल्याने #NetflixDown ट्विटरवर ट्रेंड करत आहे. वापरकर्त्यांना या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. डाउन डिटेक्टरकडूनही नेटफ्लिक्स डाउन असल्याचं कन्फर्म करण्यात आलं आहे.

तर आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरनुसार रविवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ११,००० हून अधिक वापरकर्त्यांची Netflix सेवा बंद होती. डाउनडिटेक्टरला वापरकर्त्याकर्त्यांकडून आलेल्या रिपोर्ट्स मधून हे स्पष्ट झालं.

बराचवेळ बंद होती Netflix सेवा
डाऊन डिटेक्टरनुसार, सकाळी ५ वाजता ही गडबड लक्षात आली. जवळपास ६.४९ वाजता हा प्रॉब्लेम संपला. या आउटेजमुळे लव्ह इज ब्लाइंड: द लाइव्ह रीयुनियन या शोच्या प्रसारणास विलंब झाला. व्हेनेसा आणि निक लॅची हे होस्ट करणारा हा शो लॉस एंजेलिसमधून प्रसारित केला जाणार होता. नेटफ्लिक्स युजर्स शो सुरू होण्याच्या १० मिनिटं आधी शोच्या वेटिंग रूममध्ये सामिल झाले. पण नेटफ्लिक्स डाऊनमुळे हा शो वेळेवर सुरुच झाला नाही.

नेटफ्लिक्सने माफी मागितली
या सर्व प्रकाराबद्दल नेटफ्लिक्सने ट्विट करून युजर्सची माफी मागितली आहे. सकाळी सातच्या सुमारास Netflix नं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केलं की,”उशीरा उठलेल्या, लवकर उठलेल्या, रविवारच्या दुपारी तुमचा आवडता शो चुकलेल्या प्रत्येकासाठी… आम्ही लव्ह ब्लाइंड लाइव्ह रीयुनियन शोला नियोजित वेळेप्रमाणे टेलिकास्ट करु शकतो नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आता त्याचं फिल्मिंग करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर नेटफ्लिक्सवर तुमच्यासाठी घेऊन येऊ. पुन्हा, धन्यवाद आणि क्षमस्व.’

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.