Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio Recharge : १ वर्षापर्यंत रिचार्जचं टेन्शनचं नाही, जिओ ऑफर करतेय एकापेक्षा एक दमदार रिचार्ज

25

Reliance Jio Recharge Pack:रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. सर्वात नंतर म्हणजेच २०१६ मध्ये सुरु होऊनही जिओने इतर दिग्गज मोबाईल नेटवर्क कंपन्यांना मागे टाकत आपल नेटवर्क सर्वात मजबूत केलं आहे. सुरुवातीला फ्री इंटरनेट सेवा देत आधी जिओने आपले युजर्स वाढवले. त्यानंतर एकापेक्षा-एक दमदार रिचार्ज देत इतर कंपन्यांना मागे टाकलं असून आताच्या घडीला जिओकडे दमदार रिचार्ज प्लॅन्स आहेत. ११० रुपयांपासून त्यांचे प्लॅन्स सुरु होत असून अगदी एक वर्षाच्या वैधतेचे प्लॅनही त्यांच्याकडे आहेत. या विविध प्लॅन्समध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉल, एसएमएस आणि डेटा यासारख्या विविध सुविधा मिळतात. या रिचार्जमुळे दर काही दिवसांनी रिचार्जचं टेन्शन संपणार आहे, चला तर जाणून घेऊ जिओच्या काही खास रिचार्ज प्लॅन्सबद्दल…

​१५५९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या १५५९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ही संपूर्ण एक वर्ष नसून 336 दिवसांची आहे. जिओचा हा प्रीपेड प्लान अमर्यादित व्हॉइस कॉलसह येतो. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि व्हॉइस कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटाही मिळतो. तसंच प्लॅनमध्ये 3600 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. यासोबत या प्लानमध्ये JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जाते.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

​२०२३ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

​२०२३ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

सध्या २०२३ वर्ष सुरु असून अशामध्ये २०२३ रुपयांचा नवीन Jio प्रीपेड रिचार्ज प्लॅनही जिओने आणला आहे. याची वैधता 252 दिवसांची आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो, म्हणजेच या प्लानमध्ये ग्राहक एकूण ६३० जीबी डेटा वापरू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि एकूण १०० एसएमएस दररोज दिले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud मध्ये मोफत प्रवेश देखील मिळू शकतो.

वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

२५४५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

२५४५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

Jio च्या आणखी एका रिचार्ज प्लॅनची किंमत २५४५ रुपये असून हा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या रिचार्जमध्ये ग्राहक एकूण ५०४ जीबी डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud ची सुविधा देखील मोफत उपलब्ध आहे.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

२८७९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

२८७९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

२८७९ रुपयांच्या रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. विशेष म्हणजे हा प्लॅन संपूर्ण एक वर्षाच्या वैधतेसह म्हणजेच 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण ३६५ दिवसांसाठी ७३० जीबी डेटा देण्यात आला आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची आणि डेली १०० एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.

वाचा : ​Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

​२९९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

​२९९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन

या यादीतील सर्वात दमदार आणि महागडा रिचार्ज म्हणजे २९९९ रुपयांचा Jio प्रीपेड पॅक. या पॅकची वैधता ३६५ दिवसांची आहे. म्हणजेच, जर तुम्ही एकदा रिचार्ज केलं असेल तर तुम्हाला १ वर्षासाठी कोणतेही टेन्शन नाही. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज २.५जीबी डेटा येतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा देण्यात आला आहे. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये JioTV, JioSecurity, JioCinema आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.

वाचाःJio Recharge: २४० रुपयात ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.