Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईतील हे थिएटर झाले फूल
सलमान खानच्या चित्रपटाची क्रेझ पाहता रविवारी संध्याकाळपासूनच अनेक मर्यादित चित्रपटगृहांमध्ये आगाऊ बुकिंग सुरू झाले. आगाऊ बुकिंगसाठी तिकीट खिडकी उघडताच, चित्रपटाची जवळपास सर्व तिकिटे मुंबईतील वांद्रे येथील सर्वात मोठे सिंगल स्क्रीन थिएटर ‘गीटी गॅलेक्सी’ येथे तासाभरात विकली गेली.
गिटी गॅलेक्सीच्या शनिवार आणि रविवारच्या सर्व शोची तिकिटे विकली गेली आहेत आणि चारपैकी तीन शो आधीच फूल झावे आहेत. मुंबईतील गिटी गॅलेक्सी थिएटरमध्ये सलमान खानचे चित्रपट पाहण्याची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ असते.
‘किसी का भाई, किसी की जान’ संपूर्ण भारतात रिलीज होणार
सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ चित्रपटाचे आगाऊ बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. सिनेमाचं तिकीट बुकिंग साइटवर, मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटर बारीवर सुरू झाले आहेत. वीकेंडच्या तिकिटांची किंमत १३० ते ६०० रुपयांपर्यंत आहे. तर दिल्लीत, शनिवार आणि रविवारच्या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत २५० ते १ हजार २०० रुपयांपर्यंत आहे.
२१ एप्रिलला ईदला प्रदर्शित होणारा हा चित्रपट पाहण्यात ९२ टक्के लोकांनी रस दाखवला आहे. सलमानचा हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित होत आहे. हिंदीशिवाय ‘किसी का भाई, किसी की जान’ तमिळ, तेलगूसह इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सलमान खानसोबत हे स्टार्स दिसणार
किसी की भाई, किसी की जान या चित्रपटात चाहत्यांना पूजा हेगडे सलमान खानसोबत पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि जस्सी गिल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय साऊथ स्टार वेंकटेश आणि जगपती बाबूदेखील चित्रपटात दिसणार आहेत.
परिणीती चोप्राची एअरपोर्टवर झलक, पापाराझींच्या प्रश्नावर हसून उत्तर