Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sony Bravia 80 इंचाचा टीव्ही लाँच, घरातच मिळणार थिएटरचा एक्सपीरियन्स

40

नवी दिल्लीःSony ने Bravia X80L सीरीज चा नवीन टीव्ही लाँच केला आहे. सोनीचा नवीन टीव्ही ८५ इंच, ५० इंच आणि ४३ इंचात लाँच केला आहे. यात X1 4K HDR पिक्चर प्रोसेसर दिले आहे. जे ऑब्जेक्ट-बेस्ड एचडीआर रीमास्टर सोबत शानदार व्ह्यूइंग एक्सपीरियन्स देते. यात ऑन-स्क्रीन शानदार कंट्रास्ट कलर्स मिळते. यात जास्त डेप्थ, टेक्सचर आणि लाइव्ह व्हिज्युअल्स मिळते.

टीव्हीचे फीचर्स

  • या टीव्हीत डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट मिळतो. ज्यात तुम्हाला घरातच थिएटर सारखा एक्सपीरियन्स मिळतो.

  • X80L सीरीजमध्ये एक्स बॅलेन्स्ड स्पीकर सोबत इमर्सिव्ह साउंड एक्सपीरियन्स दिले आहे.

  • या सीरीजच्या टीव्हीत 700,000+ मूव्ही आणि टीव्ही सीरीज सोबत 10,000+ अॅप्स आणि गेम्स मिळते.

  • नवीन ब्राविया एक्स८० एल सीरीज सोबत 10,000+ अॅप्लिकेशन डाउनलोड केले जाऊ शकते. तसेच 700,000+ चित्रपट आणि डीव्ही एपिसोड पाहू शकतात. याशिवाय, लाइव्ह टीव्हीची मजा घेऊ शकतात.

हा टीव्ही व्हाइस इनेबल्ड आहे. याचाच अर्थ तुम्ही आवाजाने टीव्हीला चालू बंद करू शकता. हँड्सफ्री व्हाइस सर्च फीचर सोबत तुम्ही तुमच्या पसंतीचे शो आणि फिल्मे चालवू शकतात. टीव्ही सोबत इंटरअॅक्ट करू शकता. टीव्हीत गेम मेन्यू फीचर तुम्हाला गेमिंग स्टेट्स सेटिंग्स आणि गेमिंग असिस्ट फंक्शन सर्व एकाच ठिकाणी मिळते. या सीरीजच्या टीव्ही एक्स प्रोटेक्शन प्रो टेक्नोलॉजी सोबत येते. यात धुळीमुळे टीव्ही खराब होत नाही. सोनी टीव्ही लायटिंग टेस्टिंगच्या हाय स्टँडर्ड मानका सोबत पास केले आहे. ज्यात वीज कमी जास्त झाली तरी टीव्ही खराब होत नाही.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

टीव्हीची किंमत
Sony स्मार्ट टीव्हीच्या KD-43X80L मॉडलची किंमत ९९ हजार ९०० रुपये आहे. या टीव्हीची विक्री १९ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहे. तर KD-50X80L मॉडलची किंमत १ लाख १४ हजार ९०० रुयपे आहे. या टीव्हीला सुद्धा १९ एप्रिल पासून खरेदी करता येऊ शकते. तर Sony KD-85X80L मॉडलच्या किंमतीची लवकरच घोषणा केली जाणार आहे. या सर्व मॉडलला सोनीच्या इंडिया स्टोर आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवरून खरेदी करता येऊ शकते.

वाचाःWork From Home : आता घरबसल्या कमवू शकता पैसे, डॉलर्समध्ये कराल कमाई

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.