Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजकाल सर्वच लॉन्चिग इव्हेंट ऑनलाईन पद्धतीने होताना दिसतात. त्यामुळे Vivo च्या अधिकृत YouTube चॅनेलद्वारे या मोबाइल फोनचा लॉन्च इव्हेंट देखील तुम्ही पाहू शकाल. दरम्यान Vivo X90 सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले जाऊ शकतात, ज्यामध्ये पहिला Vivo X90 आणि दुसरा Vivo X90 Pro हे मॉडेल असणार आहेत.
Vivo X90 चे खास फीचर्स
Vivo X90 मालिकेतील फोन्समध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 9200 चा सपोर्ट मिळेल. हे मोबाइल फोन 12GB पर्यंत रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेजसह लॉन्च केले जाऊ शकतात. फोनच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Vivo X90 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा IMX866 प्राइमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर असेल. समोर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.
बॅटरीचं काय?
रिपोर्ट्समधून समोर येणाऱ्या माहितीनुसार Vivo X90 मध्ये तुम्हाला 120 W फास्ट चार्जिंगसह 4810 mAh बॅटरी मिळेलय तर Vivo X90 Pro मध्ये तुम्हाला 120 W चार्जरसह 4870 mAh बॅटरी मिळेल.
किंमतीचं काय?
इंटरनेटवरील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की Vivo X90 स्मार्टफोन ४०,००० ते ४५,००० रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. पण अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन