Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Netflix, Hotstar, Amazon चं सब्सक्रिप्शन मोफत, १००० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येतात Airtel-Jio चे बेस्ट पोस्टपेड प्लॅन

33

नवी दिल्ली :Netflix, Hotstar, Prime Free : आजकाल नवनवीन सिनेमे, वेब सिरीज हे सारं वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. त्यामुळे अनेकजण सिनेमा पाहण्याची मजा आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर घरबसल्याचं घेणं पसंत करत आहेत. एकापेक्षा एक वेब सिरीजही OTT वर रिलीज होत असल्यानं नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्नी + हॉटस्टार सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना वेब सीरिज, चित्रपटांसह स्पोर्ट्स इव्हेंट यांसारखी सर्वप्रकारची एन्टरटेंनमेंट मिळते. आता या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मच सब्सक्रिप्शन घेण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. पण आता तुम्ही काही खास मोबाईल रिचार्ज केल्यास तुम्हाला मोफत हे सब्सक्रिप्शनही मिळणार आहेत. तर Airtel, Jio, Vi च्या त्या प्लान्सबद्दल जाणून घेऊ जे 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मोफत OTT सबस्क्रिप्शन देतात.

५९९ रुपयांचा एअरटेल पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची ऑफर दिली जाते. या प्लॅनमध्ये कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत अॅड-ऑन सिम कार्ड देखील उपलब्ध आहे. त्यामुळे एका रिचार्जमध्ये एका कुटुंबातील दोनजण वेगवेगळे नंबर वापरु शकतात. या प्लॅनमध्ये दरमहा 105 GB डेटा मिळतो. त्यापैकी 75 GB डेटा प्राथमिक कनेक्शनसाठी आहे तर 30 GB डेटा अॅड-ऑन सदस्यासाठी आहे. प्लॅनमध्ये 200 GB डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये अॅड-ऑन कनेक्शन घेतल्यास दरमहा २९९ रुपये द्यावे लागतात. तर यातील महत्त्वाचं म्हणजे प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या OTT सबस्क्रिप्शनमध्ये Airtel ग्राहकांना ६ महिन्यांसाठी Amazon Prime सबस्क्रिप्शन, डिस्ने + हॉटस्टारची एक वर्षासाठी मोफत मेंबरशिप देते. या प्लॅनमध्ये Xstream मोबाईल पॅक देखील मोफत आहे.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​९९९ रुपयांचा एअरटेल पोस्टपेड प्लॅन

​९९९ रुपयांचा एअरटेल पोस्टपेड प्लॅन

एअरटेलचा ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन ग्राहकांना तीन अॅड-ऑन सिम कार्ड ऑफर करतो. या प्लॅनमध्ये दरमहा 190 GB डेटा मिळतो. ज्यामध्ये 100 GB प्राथमिक कनेक्शनसाठी आणि 30 GB अॅड-ऑन कनेक्शनसाठी आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर आणि 100 दैनिक एसएमएसची सुविधा आहे. वापरकर्ते 299 रुपये भरून अतिरिक्त अॅड-ऑन कनेक्शन देखील घेऊ शकतात. या पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. Airtel च्या या प्लॅनमध्ये Amazon Prime चे सबस्क्रिप्शन 6 महिन्यांसाठी, Disney + Hotstar 1 वर्षासाठी आणि Xstream moble pack मोफत उपलब्ध आहे.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

जिओचा ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

जिओचा ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

रिलायन्स जिओचा ६९९ रुपयांचा प्लॅन तीन अॅड-ऑन फॅमिली कनेक्शन ऑफर करतो. जिओ ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. या पॅकमध्ये यूजर्सला 100 GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. कंपनी या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी Amazon Prime आणि Netflix (बेसिक) सबस्क्रिप्शन ऑफर करते. याशिवाय या प्लॅनमध्ये Jio TV, JioCinema इत्यादी Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत आहे. अॅड-ऑन फॅमिली मेंबरसाठी कंपनी 99 रुपये चार्ज करते.

​वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

​जिओचा ५९९ रुपयांचा प्लॅन

​जिओचा ५९९ रुपयांचा प्लॅन

याशिवाय जिओचा ५९९ रुपयांचा प्लॅनही आहे. या प्लॅनमध्ये कोणताही अॅड-ऑन लाभ उपलब्ध नाही. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये Amazon Prime आणि Netflix व्यतिरिक्त Jio Cinema आणि Jio TV चे सबस्क्रिप्शन मोफत आहे.

​वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

​व्होडाफोन आयडियाचा ५०१ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

​व्होडाफोन आयडियाचा ५०१ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea ५०१ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 90 GB डेटा मिळतो. याशिवाय एका महिन्यात ३००० एसएमएस दिले जातात. कंपनी या प्लॅनमध्ये एकूण 200GB डेटा रोलओव्हर सुविधा देते. Vodafone Idea चे ग्राहक या प्लॅनमध्ये मध्यरात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित डेटा वापरू शकतात. Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये 6 महिन्यांसाठी Amazon Prime, 1 वर्षासाठी Disney + Hotstar आणि Vi Movies & TV अॅपवर VIP अॅक्सेस यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.
​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

व्होडाफोन आयडियाचा ७०१ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

व्होडाफोन आयडियाचा ७०१ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea च्या ७०१ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. डिस्ने + हॉटस्टार सुपरचे 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. या प्लॅनमधील इतर सर्व फायदे फक्त ७०१ रुपयांचे आहेत.

वाचा :Samsung Galaxy A24 लाँच होण्याआधीच फीचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह आणखी बरच काही, किंमत किती?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.