Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

NetFlix, Amazon Prime ला टक्कर देणार Jio चं नवं OTT ॲप, किंमतही खिशाला परवडणारी

58

नवी दिल्ली :Reliance Jio OTT App : आजकाल नवनवीन सिनेमे आणि दमदार अशा वेब सिरीज सारंकाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. एकीकडे नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार या ॲप्सची सर्वत्र हवा असताना आता यांना टक्कर देण्यासाठी Reliance Jio एक नवीन OTT ॲप लॉन्च करणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या ॲपसा ‘JioVoot’ म्हणूनही ओळखले जाऊ शकते. हे ॲप नवनवीन सिनेमे, वेब सिरीजसह विविध सामने दाखवेल असं म्हटलं जात आहे. एकंदरीत काय तर JioVoot हे ॲप थेट Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime Video शी स्पर्धा करेल.

JioVoot चं सब्सक्रिप्शन कितीला?
JioVoot ची सुरुवातीची मासिक सदस्यता योजना 99 रुपये असू शकते. याशिवाय जिओ बेस, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅनही लॉन्च करू शकते. या प्लॅनपैकी, प्रीमियम प्लॅन उच्च दर्जाच्या व्हिडिओ क्वॉलीटीसह विशेष फीचर्स देखील प्रदान करेल. याशिवाय, Jio Voot चा वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन देखील लॉन्च केला जाऊ शकतो.

वाचा :Netflix, Hotstar, Amazon चं सब्सक्रिप्शन मोफत, १००० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येतात Airtel-Jio चे बेस्ट पोस्टपेड प्लॅन

JioCinema चं होणार JioVoot?
JioVoot ॲपच्या लॉन्च तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हे ॲप आयपीएल हंगामानंतर म्हणजेच 28 मे नंतर लॉन्च केले जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की Jio आपल्या जुन्या JioCinema ॲपचे नाव बदलून JioVoot करू शकते. JioCinema ॲप सध्या विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा आहे ज्यावर IPL 2023 चे थेट प्रक्षेपण केले जात आहे. गेल्या आठवड्यात, काही अहवालांनी असेही सुचवले होते की जिओ सिनेमा ॲप साठी आता पैस आकारू शकते.

वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.