Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​नवा SmartPhones घ्यायचा विचार करताय? थांबा, मे महिन्यात येतायत एका पेक्षा एक भारी फोन्स

20

Smarphones Coming in May : सध्याच्या या आधुनिक युगात टेक्नोलॉजी दररोज नवनवीन प्रकारे अपग्रेड होत आहे. स्मार्टफोन्समध्ये नवनवीन फीचर्स येत आहेत आणि हे फीचर्स चालावे यासाठी फीचर्ससोबतच नवनवीन फोन्सचे मॉडेलही मार्केटमध्ये लाँच होत आहेत. आता जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडा वेळ थांबा कारण मे महिन्यात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन लाँच होत आहेत. यामध्ये Realme, Google, Samsung आणि OnePlus अशा आघाडीच्या कंपन्यांचे एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन समाविष्ट आहेत. यामध्ये बहुतेक फोन्स हे मिड-रेंज स्मार्टफोन्स आहेत म्हणजेच याची किंमत थोडी अधिक असली तरी फीचर्सही जबरदस्त असणार आहेत. चला तर जाणून घेऊया मे मध्ये कोणते स्मार्टफोन्स लाँच होत आहेत…

Realme 11 Pro, Realme 11 Pro+

Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे रिअलमी दोन फोन मे मध्ये लॉन्च होतील. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7000 चिपसेट दिला जाऊ शकतो. Realme 11 Pro+ स्मार्टफोनच्या मागील बाजूस 200 MP प्राथमिक कॅमेरा सेन्सर दिला जाईल. फोनला 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले दिला जाईल. याशिवाय 16 MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. तसेच, 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाईल. Realme 11 Pro च्या मागील पॅनलवर 108 MP चा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच, 67W फास्ट चार्जसह 5,000mAh बॅटरी मिळू शकते.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Google ​Pixel 7a

google-pixel-7a

Google कंपनीचा Pixel 7a हा फोन १० मे रोजी Google च्या I/O इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा फोन Pixel 6a स्मार्टफोनचा एक मोठा अपग्रेड असू शकतो. Pixel 7a मध्ये मोठी बॅटरी, 90Hz डिस्प्ले, Google चा नवीन फ्लॅगशिप चिपसेट आणि चांगला रेअर कॅमेरा सेटअप असेल.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Google Pixel fold

google-pixel-fold

Google चा आणखी एक फोनही आता लगेचच लाँच होत आहे. विशेष म्हणजे हा फोन फोल्डेबल फोन आहे. सॅमसंग आपला हा फोल्डेबल स्मार्टफोन Google Pixel Fold Google I/O इव्हेंटमध्ये लॉन्च करेल, जो 10 मे रोजी सुरू होणार आहे. जर लीक झालेल्या माहितीचा विचार केला तर पिक्सेल फोल्डमध्ये फोल्ड केल्यावर 5.8-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. तर उलगडल्यावर 7.6-इंचाचा डिस्प्ले मिळेल. यामध्ये Tensor G2 चिपसेट सपोर्ट दिला जाईल. त्याची किंमत जवळपास १,३९,८४० रुपये असू शकते.

​वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

​OnePlus Nord 3

oneplus-nord-3

या यादीत वनप्लस कंपनीचा फोन OnePlus Nord 3 हा देखील आआहे. हा स्मार्टफोन मे अखेरीस किंवा जूनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या मिड-रेंज 5G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ते 5,000mAh बॅटरी असू शकते. कंपनी 100W फास्ट चार्जरसाठी सपोर्ट देऊ शकते. तसंच फोनमध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच, 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. OnePlus Nord 3 च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

​वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

​Samsung Galaxy M54

samsung-galaxy-m54

आघाडीची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग देखील मे महिन्यात आपला नवा-कोरा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. सॅमसंग त्यांचा Samsung Galaxy M54 हा फोन लॉन्च करू शकते. या फोनचे फीचर्स म्हणाल तर अगदी दमदार असे असणार आहेत. कारण फोनमध्ये 108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 6. 7 इंच डिस्प्ले मिळू शकतो. फोनला 120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची अपेक्षा आहे. किंमतीचं म्हणाल तर ३७,९९९ रुपयांच्या आसपास याची किंमत असू शकते.

​वाचा :Samsung Galaxy A24 लाँच होण्याआधीच फीचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह आणखी बरच काही, किंमत किती?

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.