Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर गेल्या तीन महिन्यांपासून हिंदी चित्रपट जगताच्या नजरा खिळल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’ वगळता एकही चित्रपट चांगला कलेक्शन करू शकला नाही. अजय देवगण निर्मित आणि दिग्दर्शित ‘भोला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नसल्याने चित्रपटाच्या मार्केटिंग एजन्सींनाही मोठा झटका बसला.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे भवितव्य रविवारपर्यंत ठरले जाणार असून, रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत जर हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई करू शकला नाही, तर तो सोमवारी सपशेल आपटेल असेही म्हटले जात आहे.सलमान खानच्या विश्वासार्हतेचा प्रश्न
‘किसी का भाई किसी की जान’ हा दिग्दर्शक फरहाद सामजीचा सलग तिसरा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना आवडला नाही. अक्षय कुमारचा सुपरफ्लॉप चित्रपट ‘बच्चन पांडे’ आणि त्यानंतर डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या ‘पॉप कौन’मुळे फरहाद सामजीच्या ब्रँडिंगचेही बरेच नुकसान झाले आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट आधी निर्माता साजिद नाडियादवाला ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या नावाने बनवणार होता पण नंतर सलमानने हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या निर्मिती संस्थेच्या नावाने बनवण्याचा निर्णय घेतला.
सलमान खान टॉप १०ओपनिंग डे कलेक्शनच्या बाबतीत सलमान खानचे टॉप 10 सिनेमे
चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई रुपयांमध्येभारत (२०१९) ४२.३०
प्रेम रतन धन पायो (२०१५) ४०.३५
सुलतान (२०१६) ३६.५४
टायगर जिंदा है (२०१७) ३४.१०
एक था टायगर (२०१२) ३२.९३
रेस ३ (२०१८) २८.५०
बजरंगी भाईजान (२०१५) २७.२५
किक (२०१४) २६.४०
दबंग ३ (२०१९) २४.५०
बॉडीगार्ड (२०११) २१.६०सलमान खानला पाहून चाहते भारावले, ईद दिवशी कडक सुरक्षेत दबंग बाल्कनीत