Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

BHR घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अटकेत; आणखी मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता

18

नाशिक / जळगाव: जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवर याला आज नाशिक येथून अटक करण्यात आली. मागील चार महिन्यांपासून फरार असलेला झंवर एका भाजप नेत्याच्या घराशेजारील घरात लपून बसला होता. त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे.

बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी जळगावात छापे घातले होते. यावेळी सहा संशयितांना अटक केली होती. दहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून मुख्य संशयित असलेले अवसायक जितेंद्र कंडारे व जितेंद्र झंवर फरार होते. त्यानतंर पु्न्हा गुन्हे शाखेने १७ जून रोजी राज्यभरातून मोठे कर्जदार असलेल्या १२ जणांना अटक केली होती. त्यानतंर या गुन्ह्यातील अवसायक जितेंद्र कंडारे याला देखील पोलिसांनी २८ जून रोजी इंदोर येथून अटक केली आहे.

अखेर असा गवसला सुनिल झंवर

सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. मागील काही १० दिवसापासून पोलिसांना झंवरचा सुगावा लागलेला होता. अहमदाबाद त्यांनतर उज्जेन आणि काल रात्री तो नाशिक येथे पोहचला. नाशिकला पोहोचल्याची खबर देखील पोलिसांना मिळाली होती. काल सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी घरावर नजर ठेवली होती. आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पोलिसांनी त्याला अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यापूर्वी ज्यावेळी झंवर गॅलरीत आला. त्यावेळी त्याचे गपचूप फोटो काढून झंवरच असल्याचे खात्री झाल्यानतंर पोलिस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. नाशिक येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे झंवरला पुण्याला घेऊन जाणार आहेत.

बीएचआर गैरव्यवहारातील झंवरचा सहभाग

बीएचआर गैरव्यवहाराच्या पोलिस तपासात समोर आलेल्या माहीतीनुसार , बीएचआरची अधिकृत वेबसाईट असतांना बनावट सॉफ्टवेअर तसेच वेबसाईट तयार करून पतसंस्थेच्या मालमत्ता गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार करण्यात आला होता. तसेच पोलिसांच्या छापेमारीत सुनिल झंवर याच्या जळगावातील घरात व कार्यालयात अनेक संशयास्पद दस्तऐवज सापडले होते. त्यात वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे अनेक बनावट शिक्के, महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह, एटीएम कार्ड आणि काही लोकप्रतिनिधींचे लेटरपॅड देखील सापडले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय म्हणून सुनील झंवर याची ओळख आहे. त्याच्या अटकेमुळं महाजन यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शालेय पोषण आहार भ्रष्टाचारात देखील झंवरचे कनेक्शन असण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.