Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जिओचा हा पोस्टपेड प्लॅन बिलिग सायकलसह अनलिमिटेड कॉलिग आणि दररोज १०० एसएमएससह येतो. तसंच प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अधिकच्या बेनिफिट्सबद्दल म्हणाल तर, कंपनी आपल्या युजर्सना नेटफ्लिक्सचं बेसिक सब्सक्रिप्शन आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन देत आहे. याशिवाय यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा ॲप्सनाही ॲक्सेस मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
जिओचा १४९९ रुपयांचा दमदार प्लॅनही उपलब्ध
तर जिओ कंपनी पोस्टपेड प्लॅनमध्ये आणखी एक जबरदस्त प्लॅन घेऊन आली आहे. या दमदार रिचार्जमध्ये तुम्हाला तब्बल ३००जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्येही कंपनी फ्री वॉईस कॉलिंगसह अनलिमिटेड एसएमएस देत आहे. याशिवाय या प्लॅनमध्येही कितीतरी अधिकचे फायदे युजर्सना मिळत आहेत. यामध्ये नेटफ्लिक्सचं मोबाईल सब्सक्रिप्शन आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन कंपनी देत आहे. याशिवाय यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा ॲप्सनाही ॲक्सेस मिळणार आहे.
२,६९१ शहरांमध्ये आता JIO 5G
रिलायन्स जिओने आता त्यांचं 5G नेटवर्क देशाच्या जवळपास २,६९१ शहरांमध्ये सुरु केलं आहे. त्यामुळे अनेकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असून विशेष म्हणजे इतक्या जास्त शहरांत 5G सेवा पुरवणारा रिलायन्स पहिलं टेलिकॉम नेटवर्क बनलं आहे. ज्या शहरांमध्ये 5G नेटवर्क आहे,त्याठिकाणी 1gbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा युजर्सना मिळणार असून बऱ्याच वेलकम ऑफर्सही जिओकडून दिल्या जात आहेत.
वाचाःकडक फीचर्ससह कॅमेराही जबरदस्त, ‘या’ महिन्यातील टॉप-5 बजेट स्मार्टफोन्सची यादी एका क्लिकवर