Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

14

नवी दिल्ली :One Plus 10 Pro Smartphone Offer : एकीकडे अॅपलच्या फोनची हवा असताना त्यांना टक्कर देण्यासाठी अॅन्ड्रॉईड फोन म्हणाल तर वनप्लसचे फोन. प्रीमियम स्मार्टफोन तयार करण्यात आघाडीवर असणारी वनप्लस कंपनी एकापेक्षा-एक स्मार्टफोन बाजारात आणत आहे. यामध्ये आता वनप्लसचा नवाकोरा 5g सपोर्टेड फोन Oneplus 10 pro हा एक दमदार फीचर्स असणारा प्रिमीयम स्मार्टफोन आहे. दरम्यान या फोनवर कंपनी तगडं डिस्काउंट देत असून फ्लिपकार्टवर जवळपास २५ टक्के रुपये मूळ किंमतीवर वाचवता येणार आहेत.

तर या फोनच्या ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ६६,९९९ रुपये असून यावर २५ टक्के डिस्काउंट मिळत आहेत. ज्यामुळे फोन थेट ४९,९८० रुपयांपर्यंत येत आहे. विशेष म्हणजे हा फोन विकत घेण्यासाठी तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास आणि १००० रुपयांची सूट तुम्हाला मिळणार आहे. तसंच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

One Plus 10 Pro चे फीचर्स
वनप्लसचा हा फोन ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेजसह १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये आहे. प्रोसेसरचं म्हणाल तर कंपनीं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8th Gen चिपसेट देण्यात आला आहे. तसंच डिस्प्लेचं म्हणाल तर ६.७ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आणि 128 रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तसंच गोरिला ग्लास प्रोटक्शनही यात आहे. आता फोनच्या कॅमेऱ्याबाबत म्हणाल तर यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा तसंच ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेंसर आहे. तसंच सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फोनच्या बॅटरीचं म्हणाल तर हा 5G फोन तब्बल 5000mAh च्या बॅटरीसह 80W चार्जिंगला सपोर्टेड आहे. हा फोन अॅन्ड्रॉईड १२ वर आधारीत आहे.

वाचाःAsus ने लाँच केले ८ नवे लॅपटॉप, प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास, पाहा संपूर्ण यादी सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.