Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अक्षय्य तृतीयेसमान बनतोय लाभकारी योग, ‘या’ गोष्टी केल्याने लक्ष्मी होईल प्रसन्न

5

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुरु ग्रह अस्त झाला आणि २७ एप्रिलला गुरु ग्रहाचा उदय होत असून, या दिवशी गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे. जर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बृहस्पती अस्तामुळे तुम्हाला सोने, चांदी इत्यादी खरेदी करता आले नाही किंवा पूजा करता आली नाही, तर हा दिवस अक्षय्य तृतीयेसारखाच लाभदायक असेल. २७ एप्रिल रोजी गुरु उदया सोबत गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग असून, याच दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी असे शुभ योगही तयार होत आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. ज्योतिष शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने धन, ऐश्वर्य, कीर्ती, प्रतिष्ठा वाढण्यासोबतच कुंडलीत गुरुचे स्थानही मजबूत होईल. जाणून घेऊया या दिवशी करावयाचे उपाय.

यांच्या पूजेने आरोग्य, समृद्धी प्राप्त होते

ज्योतिष शास्त्रानुसार गुरु उदय होणार त्या दिवशी तयार होत असलेल्या शुभ संयोगात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने नोकरी-व्यवसायात प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि वय, आरोग्य, समृद्धी, भौतिक सुख-सुविधा प्राप्त होतात. या शुभकाळात लक्ष्मी नारायणाला पंचामृताने दूध, दही, मध, तूप, गंगाजल इत्यादींनी स्नान करून पूजा करावी.

यांचा पाठ केल्याने लाभेल धनसंपत्ती

यांचा पाठ केल्याने लाभेल धनसंपत्ती

गुरु उदय होणार त्या दिवशी घडणाऱ्या या शुभ संयोगांमध्ये तुपाचा दिवा लावून विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करावा. शुभ योग आणि शुभ संयोगात हे पठण केल्याने भौतिक इच्छा पूर्ण होतील आणि सर्व प्रकारच्या भीती दूर होतील. त्याचबरोबर संपत्ती, धान्य आणि आनंद कायम राहतो आणि प्रगतीत कोणताही अडथळा येत नाही. त्याचबरोबर कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते.

यांना द्या या भेटवस्तू

यांना द्या या भेटवस्तू

ज्योतिष शास्त्रानुसार बृहस्पतीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी या शुभ संयोगांमध्ये गुरू आणि वडिलांना वस्त्र, फळे इत्यादी काही वस्तू भेट म्हणून द्याव्यात. असे केल्याने कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होईल आणि भाग्याचे दरवाजे उघडतील. तसेच, या दिवशी कर्ज देऊ नका किंवा पैसे घेऊ नका.

गुरुपुष्यामृत योगात हे दान करा

गुरुपुष्यामृत योगात हे दान करा

२७ एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दान करणे अक्षय्य तृतीयेप्रमाणे फलदायी मानले जाते. या दिवशी सत्तू, गूळ, हरभरा, तूप, पाण्याने भरलेलं मडकं, गूळ दान करावे. असे केल्याने जीवनातील सततच्या समस्यांचा अंत होतो आणि अनेक प्रकारे समस्यांपासून मुक्ती मिळते. यासोबतच कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होते आणि त्याचा शुभ प्रभावही राहतो.

टीप :ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.