Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Online Shopping : स्वस्तात मस्त ऑनलाईन खरेदीसाठी ‘ही’ सरकारी वेबसाइट आहे बेस्ट, इतक्या स्वस्त मिळतील वस्तू

8

नवी दिल्ली :Gem Online Market:आजकाल आपण पाहिलं तर सर्वच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. अगदी भाजीपाल्यापासून ते मोठमोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सारं आपण एका क्लिकवर घरबसल्या मिळवतो. सर्वकाही आज ऑनलाईन मिळत असल्यानं नवनवीन वेबसाईट्सही येत आहेत. अशामध्ये लोकांना कमी किमतीत ज्याठिकाणी वस्तू मिळतात अशाच वेबसाइट्सचा वापर साहजिकच अधिक करणार. आता आपण सर्वाधिक म्हटलं तर Amazon आणि Flipkart यावरुन ऑर्डर करत असतो, पण अशी एक आणखी वेबसाईट आहे जिथेही स्वस्तात मस्त विविध वस्तू उपलब्ध आहेत. जाणून घेऊया कोणती आहे ही वेबसाईट…

तर भारतातील ऑनलाइन शॉपिंगच्या मार्केटमध्ये अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साइट्सची नावे लोकांच्या मनात प्रथम येतात. पण जेम नावाची वेबसाइट ही एक सरकारी बाजारपेठ आहे, जिथे ग्राहक परवडणाऱ्या किमतीत विविध प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. उत्तम दर्जाच्या वस्तू याठिकाणी मिळतात. या मार्केट प्लेसबद्दल फार कमी लोकांना माहित आहे…

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

किती स्वस्त आहेत वस्तू?

जेम वेबसाइटवर वस्तू कितपत परवडणाऱ्या आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याबद्दल जाणून घेऊ… २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणात २२ विविध प्रोडक्ट्समध्ये तुलना करण्यात आली होती, ज्यामध्ये ज्वेलरी उत्पादने आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सही होते. या सर्वेक्षणात १० उत्पादन ही इतर साइट्सच्या तुलनेत याठिकाणी स्वस्त होती. जवळपास ९.५ टक्क्यांनी ही उत्पादनं स्वस्त होती. म्हणजेच, जर एखाद्या उत्पादनाची साईटवर किंमत १०० रुपये असेल, तर त्याच उत्पादनाची किंमत रत्नावर सुमारे ९० रुपये या जेम साईटवर होती.

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.