Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Netflix, Disney+ Hotstar, Amazon, ZEE5, SonyLIV चे वार्षिक प्लान, बेनिफिट्स आणि किंमत पाहा

11

OTT Subscription : सध्याच्या डिजीटल युगाल सर्वकाही ऑनलाईन झालं आहे. त्यामुळे मनोरंजनही ऑनलाईन झालं असून त्यामुळे अधिकतर लोक हे सिनेमा, टीव्ही सिरियल हे सारंकाही घरबसल्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहणं पसंत करत असतात. तसंच आजकाल बरेच सिनेमे हे OTT वरच रिलीज होत असतात. तसंच एकापेक्षा एक वेब सिरीजही OTT वर रिलीज होत आहेत. त्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्नी + हॉटस्टार सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना वेब सीरिज, चित्रपटांसह स्पोर्ट्स इव्हेंट यांसारखी सर्वप्रकारची एन्टरटेंनमेंट मिळते. दरम्यान या सर्व प्रमुख OTT सबस्क्रिप्शनबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. प्रत्येक OTT प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना काय ऑफर करतो हे पाहण्यासाठी नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्नी + हॉटस्टार, सोनी लिव्ह, वूट अशा बाजारातील काही सर्वात लोकप्रिय OTT सब्सक्रिप्शनच्या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ…

नेटफ्लिक्स

सध्याच्या घडीला जगातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म म्हटलं तर Netflix. विशेष म्हणजे नेटफ्लिक्स केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. Netflix वर, तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये, श्रेणींमध्ये सिनेमे, वेबसिरीज पाहू शकता. विशेष म्हणजे सॅक्रेड गेम्स, दिल्ली क्राईम, जामताडा अशा कितीतरी हिंदी सिरीजसह एकापेक्षा एक सिनेमे यावर आहेत. तसंच फॉरेनच्याही बेस्ट टीव्ही शो आणि सिनेमांची रांग या प्लॅटफॉर्मवर लागते. तर अशा या दमदार ओटीटी सर्व्हिसबद्दल जाणून घेऊ.. Netflix च्या सर्वात स्वस्त प्लॅनची ​​किंमत 149 रुपये आहे. एका महिन्याच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये, एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर सिनेमे, वेब सिरीज पाहण्याची अॅक्सेस दिली जाते. याशिवाय, 199 रुपयांच्या प्लॅनमध्येही नेटफ्लिक्सच्या ग्राहकांना 149 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व फीचर्स मिळतात. पण त्यात पिक्चर क्वालिटी अधिक चांगली असते.त्यानंतर Netflix च्या 499 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झाल्यास, ग्राहक एकाच वेळी दोन डिव्हाईसवर अॅक्सेस मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये अमर्यादित चित्रपट, टीव्ही शो आणि मोबाइल गेम्स देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनसह, वापरकर्ते फुलएचडीमध्ये सामग्री पाहू शकतात. त्यानंतर येतो तो ६४९ रुपयांचा नेटफ्लिक्स प्लॅन. यामध्ये वापरकर्ते एकाच वेळी ४ डिव्हाईसेसवर कंटेंट पाहू शकतात. या प्लॅनमध्ये अल्ट्रा एचडी पिक्चर क्वालिटी कंटेंट उपलब्ध आहे.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ​

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ​

Amazon प्राइम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन एक बेस्ट OTT सबस्क्रिप्शन आहे. कारण यामध्ये तुमच्या सदस्यत्व शुल्कात विविध सिनेमे आणि वेब सिरीजच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगसह आणखीही अधिक गोष्टी समाविष्ट आहेच. यामध्ये Amazon या ई-कॉमर्स साईटवरुन वन-डे डिलेव्हरी, डिस्काउंट अशा बऱ्याच ऑफर्स मिळतात. ॲमेझॉन कंपनीचंही स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video हे आहे. यात १७९ रुपयांच्या Amazon प्राइम मंथली प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक सुविधा मिळतात. ॲमेझॉनच्या साईटवर एक-दोन दिवसांत डिलिव्हरी, Amazon प्राइम व्हिडिओ, तसंच प्राइम म्युझिक हे सगळे लाभ मिळतात. या प्लॅनची वैधता एक महिना असते. तसंच यातील ४५९ रुपयांच्या प्लॅनची वैधता तीन महिने आणि ५९९ रुपयांचा प्लॅन ६ तर १४९९ प्लॅनची वैधता १ वर्ष इतकी आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

डिस्नी + हॉटस्टार

डिस्नी + हॉटस्टार

IPL मुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे डिस्नी + हॉटस्टार. याशिवाय यावर अनेक दमदार सिनेमे आणि वेबसिरीजही आहेत. यामुळे एक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून हा प्रसिद्ध आहे. डिस्नी + हॉटस्टार सह, युजर्सना स्टार, एचबीओ, स्टार वर्ल्ड, स्टार प्लस इत्यादी टीव्ही चॅनेल्सची देखील मजा घेता येते. Disney + Hotstar च्या 1-महिन्याच्या प्लॅनची ​​किंमत 299 रुपये आहे. या प्लॅनमध्ये चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, स्पेशल शो इत्यादी कंटेट पाहिला जाऊ शकतो. युजर्स मोबाइल, टीव्ही, लॅपटॉपसह 4 स्क्रीनवर कंटेट पाहू शकतात. या प्लॅनमध्ये डॉल्बी 5.1 ऑडिओ सपोर्टसह 4K (2160p) क्वॉलीटीमध्ये कंटेट पाहता येतो. त्याशिवाय 899 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 1 वर्षांची आहे. वापरकर्ते एकाच वेळी दोन डिव्हाईसमध्ये टीव्ही किंवा लॅपटॉप, फोनवर फुलएचडी क्वॉलिटीत शो पाहता येतात. Disney + Hotstar च्या 1499 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 1 वर्षाची आहे. या प्लॅनमध्ये, ग्राहक एकाच वेळी 4K क्वॉलीटीत टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइल यांसारख्या 4 डिव्हाईसवर चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, स्पेशल वॉच यासारखे शो पाहू शकतात.

​वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

वूट

वूट

Viacom18 च्या मालकीची Voot ही ओटीटी सब्सक्रिप्शन सर्व्हिसही खूप प्रसिद्ध आहे. नुकतेच नवीन प्रोग्राम्स आणि काही जुन्या टीव्ही चॅनेल्सच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमुळे वूट फार फेमस झालं आहे. यात असुर या वेबसिरीजने फार जास्त हवा केली होती. वूट तेव्हापासून ट्रेंड करत आहे. Voot सर्व Viacom18 चे शो आणि सिनेमे देखील दाखवते. यात बिग बॉस सारखे लोकप्रिय कार्यक्रम, तसेच शो, चित्रपट आहेत.याचं सब्सक्रिप्शन म्हणाल तर ९९९ रुपयांना असून सध्या ऑफरमध्ये ५९९ रुपयांना मिळत आहे. तसंच ४९९ रुपयांचाही गोल्ड प्लॅन एक वर्षासाठी असून २९९ मध्ये मोबाईल प्लॅन एक वर्षासाठी येतो.

​वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

SonyLIV सब्सक्रिप्शन

sonyliv-

मागील काही काळात SonyLIV ने लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म म्हणून प्रेक्षकांची पसंती मिळवली आङे. या मागील एक मोठं कारण म्हणजे सोनीचं थेट स्पोर्ट्स कव्हरेज. फुटबॉलच्या प्रसिद्ध UEFA स्पर्धा, जर्मन बुंडेस्लिगा, इटालियन सिरीज ए यांचा समावेश आहे. फुटबॉल तसंच जगभरातील क्रिकेट स्पर्धाचं लाईव्ह कव्हरेज, टोकियो ऑलिम्पिक 2020 या सर्वामुळे सोनीलीव्हला लोकप्रियता मिळाली आहे. स्कॅम ही हिंदी वेबसिरीजही चांगलीच गाजली. याचं सब्सक्रिप्शन म्हणाल तर ९९९ रुपयांना एक वर्षासाठी SonyLIV चं सब्सक्रिप्शन मिळू शकतं. तसंच मंथली पॅक २९९ रुपयांना, ६ महिने ६९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय वर्षाचा मोबाईल पॅक हा ५९९ रुपयांना आहे. हा प्लॅन फक्त एका मोबाईल फोनसाठी आहे.

​वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

ZEE5

zee5

ZEE5 ने 2018 मध्ये या स्पर्धेत प्रवेश केला, ओव्हर-द-टॉप प्लॅटफॉर्म प्रख्यात झाल्यानंतर मात्र मागील काही काळात हा प्लॅटफॉर्म मागे पडला. नेटफ्लिक्स, अॅमेझॉनने सरशी केली. पण तरी काही खास शो आणि सिनेमे तशीच झीची चॅनेल्स यावर उपलब्ध असल्याने ग्राहकांची मागणी या अॅपला आहे. याचं सब्सक्रिप्शन म्हणाल तर ZEE 5 चे विविध वार्षिक प्लॅन मार्केटमध्ये असून यातील मोबाईल प्लॅन ४९९, प्रिमीयम HD ६९९ आणि प्रिमीयम 4K प्लॅन १४९९ रुपयांना उपलब्ध आहे.

​वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.