Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

IPL सामने पाहताय, पण डेटा पुरत नाही? जिओचा स्वस्तात मस्त रिचार्ज, दररोज मिळेल ३जीबी डेटा!

8

नवी दिल्ली :Jio Cricket plan for 399rs : आयपीएल २०२३ चे सामने सध्या सुरु असून एकापेक्षा एक चुरशीचे सामने दररोज होत आहेत. त्यात जिओने सर्वांसाठी आपल्या जिओ सिनेमा ॲपवर फ्रीमध्ये सामने दाखवण्याची सोय केली असून क्रिकेटप्रेमी मॅचेसची मजा घेत आहेत. पण अनेकदा एकादिवशी दोन सामनेही असतात तसंच इतरही वेळेस डेटा संपत असल्याचं अनेकांसोबत घडत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन रिलायन्स जिओने एक खास असा क्रिकेट प्लान आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. ३९९ रुपये किंमत असणाऱ्या या क्रिकेट प्लानची वैधता २८ दिवस असून यात दिवसाला ३जीबी डेटा मिळत असून सोबतच अनलिमिटेड कॉलिंगही आहे. तर रिलायन्स जिओच्या या ३९९ रुपयांच्या प्लानबद्दल सर्व काही जाणून घेऊ…रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा क्रिकेट प्लान
रिलायन्स जिओच्या या ३९९ रुपयांच्या प्लानची वैधता अर्थात व्हॅलिडिटी म्हणाल तर ती जवळपास १ महिना म्हणजे २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 90 GB हाय-स्पीड डेटा खर्च करू शकतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. Jio च्या या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील आहेत. याचा अर्थ वापरकर्ते देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित स्थानिक आणि STD व्हॉइस कॉल करू शकतात. जिओ ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात.

OTT सर्व्हिसेसचीही घ्या मजा
जिओच्या या स्वस्तात मस्त प्लानमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तुम्ही Jio चे 5G नेटवर्क वापरत असाल तर तुम्ही या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा खर्च करू शकता. रिलायन्स जिओचे ९९९ रुपये आणि २१९ रुपयांचे आणखी दोन प्लॅन आहेत, ज्यामध्ये देखील दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध आहे. पण ९९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे आणि २१९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १४ दिवसांची आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि Jio ॲप्सवर मोफत प्रवेश मिळतो.

वाचा :Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.