Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Recession2k22: जगभरात मंदीचे संकट, आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात

7

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जगभरात मंदीचे संकट आता घोंघावू लागले असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी काढण्यामध्ये ‘आयटी’तील बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ‘आयटी’ कंपन्यांनी नोकरकपातीवर भर न देता नव्या भरतीचा वेग घटवला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) देशातील तीन बड्या कंपन्यांनी (‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’, ‘इन्फोसिस’ आणि ‘एचसीएल टेक’) ६५ टक्के कमी नोकरभरती केली आहे.

या तीन कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १.९७ लाख नव्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात याच कंपन्यांनी केवळ ६८,८८६ कर्मचाऱ्यांची भरती केली. अमेरिका, युरोपातील बँकिंग संकट आणि मंदीच्या शक्यतेमुळे कंपन्यांनी कर्मचारी भरतीचे प्रमाण कमी केले आहे. एका अहवालानुसार, कर्मचारी भरतीचे घटलेले प्रमाण मंदीचे निदर्शक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ‘टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस), ‘इन्फोसिस’ आणि ‘एचसीएल टेक’ या कंपन्यांनी अतिशय कमी भरती केली. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३च्या शेवटच्या तिमाहीत या तिन्ही कंपन्यांनी ९८.७ टक्के कमी कर्मचारी जोडले. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या शेवटच्या तिमाहीत या कंपन्यांनी केवळ ८८४ कर्मचारी जोडले. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या चौथ्या तिमाहीत कंपन्यांनी एकत्रितपणे ६८,२५७ जणांना नोकऱ्या दिल्या.

‘टीसीएस’कडून २२,००० नोकऱ्या

‘टीसीएस’चे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये कंपनीने एकूण २२,६०० कर्मचाऱ्यांची भरती केली. त्याच वेळी आर्थिक वर्ष २०२२मध्ये कंपनीने सर्वाधिक एक लाख तीन हजार ५४६ कर्मचाऱ्यांची भरती केली.

‘इन्फोसिस’कडून कमी भरती

आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये ‘इन्फोसिस’ने एकूण २९,२१९ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये कंपनीने ५४,३९६ कर्मचाऱ्यांची भरती केली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) कंपनीने केवळ ३,६११ कर्मचाऱ्यांना नोकरी दिली. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या याच तिमाहीत कंपनीने २१,९४८ कर्मचारी सामावून घेतले होते.

‘एचसीएल टेक’ची अत्यल्प भरती

आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत ‘एचसीएल टेक’ने आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये कंपनीने नोकरभरती करण्यात हात आखडता घेतला. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १७,०६७ जणांना नोकरीत सामावून घेतले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीने ३९,९०० जणांना नोकरी दिली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने ३,६७४ जणांना नोकरी दिली. आर्थिक वर्ष २०२१-२२च्या याच तिमाहीत कंपनीने ११,००० जणांची भरती केली होती.

नोकरभरती एका दृष्टिक्षेपात

१.९७ लाख

तीन कंपन्यांची २०२१-२२मधील भरती

६८,८८६

तीन कंपन्यांची २०२२-२३मधील भरती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.