Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Airtel चे ५ लेटेस्ट रिचार्ज प्लान्स, अनलिमिटेड 5G स्पीडसह ओटीटी सर्व्हिसही, वाचा सविस्तर

9

Airtel 5G Recharge :आता 4G चा जमाना जाऊन 5G चं युग आलं आहे. दरम्यान रिलायन्स जिओ पाठोपाठ एअरटेलही आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. एअरटेल ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असून एअरटेल वेगाने देशात 5G सेवा वाढवत आहे. सध्यातरी ५०० हून अधिक शहरांत एअरटेलचं 5G नेटवर्क पोहोचलं आहे. दरम्यान युजर्सची संख्या आणखी वाढवण्यासाठी एअरटेल आकर्षित करणारे नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहे. एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांना अमर्यादित 5G डेटा आणि Disney + Hotstar, Amazon Prime Video सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मजा ही देऊ करत आहे. तर एअरटेलचे असेच खास लेटेस्ट ५ रिचार्जबद्दल जाणून घेऊ…

४९९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन​

या यादीतील सर्वात कमी किंमतीचा प्लान म्हणजे हाच ४९९ रुपयांचा आहे. दरम्यान यामुळे या प्लानची वैधता ही २८ दिवस इतकीच आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS दररोज मिळतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन, एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप सबस्क्रिप्शन, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन सारखे फायदे 3 महिन्यांसाठी मिळतात. जर वापरकर्ते 5G वापरत नसतील तर त्यांना 3GB दैनिक डेटासह अमर्यादित 4G डेटा मिळेल.

वाचा :Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो​

८३९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन

८३९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या ८३९ रुपयांच्या प्लॅनची वैधता जवळपास तीन महिने म्हणजेच ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज अमर्यादित 5G इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS उपलब्ध आहेत. याशिवाय वापरकर्त्यांना डिस्ने + हॉटस्टार मोबाइल, एक्सस्ट्रीम अॅप, रिवॉर्ड्समिनी आणि विंक म्युझिकचे 3 महिन्यांसाठी सबस्क्रिप्शन सारखे फायदे मिळतात. जर वापरकर्त्याकडे 5G प्रवेश नसेल, तर प्लॅन 2GB दैनिक डेटासह अमर्यादित 4G डेटा देईल.

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

३३५९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन​

३३५९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन​

या यादीतील सर्वात महागडा रिचार्ज प्लान म्हणजे हाच ३३५९ रुपयांचा आहे. यामध्येही अमर्यादित 5G डेटा, कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. पण या प्लॅनची वैधता अधिक असून एक वर्ष इतकी आहे. याशिवाय, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल, अपोलो 24|7, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन सारखी वैशिष्ट्ये 1 वर्षासाठी प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही 5G वापरत नसाल तर तुम्ही या प्लॅनमध्ये 2.5 GB दैनिक डेटासह अमर्यादित 5G डेटा वापरू शकता.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

६९९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन

६९९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या ६९९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 5G डेटा आणि 100 दैनिक एसएमएस सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहक विशेष म्हणजे प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वापरु शकतात. Xstream अॅप आणि Wynk Music चे सदस्यत्व देखील यात आहे. जर तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी वापरत नसाल तर तुम्ही दररोज 3 GB डेटासह अमर्यादित 4G डेटा खर्च करू शकता.

​वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

९९९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन​

९९९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज प्लॅन​

या यादीतील ९९९ रुपयांचा रिचार्ज प्लान देखील अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित 5G डेटा आणि 100 एसएमएस एका दिवसाला या सुविधा पुरवत आहे. या प्लॅनची वैधता ही 84 दिवसांची आहे. सोबतच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी Amazon Prime मेंबरशिप, Xstream App, Wynk Music सबस्क्रिप्शन सारखे फायदे मिळतात. जर Airtel 5G सेवा तुमच्या क्षेत्रापर्यंत पोहोचली नसेल, तर तुम्ही 2.5 GB दैनिक डेटासह अमर्यादित 4G डेटा खर्च करू शकता.

​​वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.