Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जर तुमचा लॅपटॉपवरील काम बेसिक असेल तर हा Infinix Y1 Plus Neo हा लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट आहे. एक भारी डिझाईन, दमदार बॅटरी बॅकअप आणि मोठा डिस्प्ले असल्याने हा लॅपटॉप मनोरंजनाच्या दृष्टीने देखील भारी आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची किंमत ही २२, ९९० इतकी ठेवण्यात आली असून SBI बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने आणखी २ हजार कमी होऊ शकतात. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल १६२०० रुपयांपर्यंतही सूट मिळू शकते. ज्यामुळे हा लॅपटॉप अवघ्या ६ ते ७ हजारांपर्यंतही मिळू शकतो. पण एक्सचेंज करणाऱ्या लॅपटॉपची स्थिती आणि ब्रँड, मॉडेल हे देखील तितकच महत्त्वाचं आहे. पण या एक्सचेंज ऑफरशिवायही लॅपटॉपची मूळ किंमत इतर लॅपटॉपटच्या तुलनेत परवडणारी आहे.
Infinix Y1 Plus Neo चे फीचर्स
तर Infinix Y1 Plus Neo हा अल्ट्रा क्लिअर Full HD रेज्युलेशनसह १९२०x1080 पिक्सलच्या डिस्प्लेस येतो. यात 250nits चा ब्राईटनेस येत असून लॅपटॉप अगदी हलका आणि भारी डिझाईनमध्ये आहे. विशेष म्हणजे यात 40Wh ची बॅटरी असल्याने फुल चार्जमध्ये १० तासांपर्यंत वेब ब्राऊजिंग या फोनमध्ये करता येऊ शकता. तसंच 45W फास्ट चार्जिंग आणि PD3.0 सेफ चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट देण्यात आला आहे.प्रोसेसरचं म्हणाल तर 11th Gen 10nm Intel Celeron N5100 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात तीन USB-C, दोन USB3.0, एक HDMI 1.4, एक SD कार्ड स्लॉट आणि 3.5mm चा पोर्ट देण्यात आला आहे.
वाचाःWhatsapp खास नवं फीचर, एक Whatsapp अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार