Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Whatsapp tricks : व्हॉट्सॲप चॅटिंगची मजा आणखी वाढवा, ‘या’ ट्रीक्स करा फॉलो

8

How to Use Whatsapp tricks : सध्याच्या डिजीटल युगात सारंकाही ऑनलाईन होताना दिसत आहे. आपण अगदी शेजारी असणाऱ्या व्यक्तीशी देखील कधी-कधी नकळत चॅट करतो. कार्यालयातील कितीतरी महत्त्वाच्या कामांसाठी देखील चॅटिंग ग्रुप तयार केलेले असतात. तर या सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येकजण सर्वाधिक वापरत असलेलं मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. तर हे इन्स्टंट मेसेजिंग ​ॲप व्हॉट्सॲपवर युजर्सना आणखी सुविधा देण्यासाठी आणि इंटरफेस सुधारण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स व्हॉट्सॲपचे डेव्हलपर्स आणत असतात. नुकतच व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स मागील काही दिवसांत लागू केले आहेत. दरम्यान व्हॉट्सॲप सतत नवनवीन फीचर्स आणतच असतं, पण आपल्याला यापैकी अनेक फीचर्सबद्दल माहित देखील नसतं. चलातर जाणून घेऊ अशाच काही खास व्हॉट्सॲप फीचर्सबद्दल…

असे पाठवा HD फोटो

नवीन फीचर्स अंतर्गत आता युजर्सना व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये स्वतंत्र असं फोटो अपलोड क्वालिटी सेक्शन देण्यात आलं आहे. त्याच्या मदतीने तुम्ही देखील आता हाय क्वॉलिटीचे HD दर्जाचे फोटो पाठवू शकता. उच्च दर्जाचे फोटो पाठवण्यासाठी तुम्हाला iButton वरून सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथून तुम्हाला स्टोरेज आणि डेटासह पर्यायावर टॅप करावे लागेल, त्यानंतर तळाशी तुम्हाला नवीन मीडिया अपलोड क्वॉलिटीचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला हवी ती ​क्वॉलिटी सिलेक्ट करता येईल.

​वाचा :Smartphone Explode : हीच ‘ती’ ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, ‘अशी’ घ्या काळ

ऑनलाइन स्टेटस लपवा

ऑनलाइन स्टेटस लपवा

व्हॉट्सअॅपने ऑनलाइन स्टेटस लपवण्याची सुविधाही जारी केली आहे. हे फीचर नवीन प्रायव्हसी फीचर अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवता येऊ शकते, असे केल्यावर त्यानंतर तुमचे ऑनलाइन स्टेटस तुमच्या कॉन्टॅक्ट्सना दिसणार नाही. म्हणजेच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस लपवू शकता. हे फीचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

कसं लपवाल ऑनलाईन स्टेटस?

कसं लपवाल ऑनलाईन स्टेटस?

ऑनलाइन स्टेटस लपवण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. आता येथून प्रायव्हसी ऑप्शनमध्ये, तुम्हाला सर्वात वरती शेवटचा Seen आणि Online हा पर्याय दिसेल. या फीचरमध्ये युजरला प्रायव्हसीसाठी दोन पर्याय दिलेले आहेत, एका ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्सना दाखवू शकता, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी लपवले जाईल.

या फीचरच्या मदतीने, तुमचं ऑनलाइन स्टेटस कोण पाहणार हे तुम्ही स्वत: ठरवू शकाल, म्हणजेच तुम्ही इच्छेनुसार तुमची ऑनलाइन स्थिती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी करू शकता. हे फीचर्स व्हॉट्सअॅपच्या स्टेटस फीचरप्रमाणे काम करतात, ज्यामध्ये यूजरला Who Can See चा पर्याय मिळतो.
​वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

​नंबर सेव्ह न करता करा चॅट

​नंबर सेव्ह न करता करा चॅट

ही एक समस्या आहे ज्याचा सामना अनेक वापरकर्ते करतात. अनेकांना whatsapp वर नंबर सेव्ह करायचा नसतो आणि काही कामासाठी चॅट करायचं असतं. काळजी करू नका, ही बातमी वाचल्यानंतर तुमची चिंता संपेल आणि तुम्ही कोणताही फोन नंबर सेव्ह न करता चॅट करू शकाल. यासाठी, तुम्हाला ज्या क्रमांकाशी चॅट करायचे आहे तो नंबर टाइप करून कॉपी-पेस्ट करावा लागेल.

​​​वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

OTP शेअर कराल तर होईल घात

otp-

​तुम्ही एकतर स्वतःला नंबर पाठवू शकता किंवा दुसर्‍या कॉन्टॅक्टला पाठवू शकता. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील संपर्काला पाठवलेल्या नंबरवर टॅप करायचे आहे. तुम्ही टॅप करताच, तुम्हाला चॅट करण्याचा, व्हॉट्सअॅपवर कॉल करण्याचा आणि नंबर सेव्ह करण्याचा पर्याय दिसेल. यातील पर्याय तुम्हाला नंबर सेव्ह न करता थेट चॅट करू देतो.

​वाचा :Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.