Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी झालेल्या एजीएममध्ये जिओ एअरफायबर सेवा सादर केली होती. ही सेवा वापरकर्त्यांना वायरलेस पद्धतीने फायबरसारखी सुविधा देणार असल्याचे त्याच्या नावावरून स्पष्ट होते. यासाठी कंपनी 5G अँटेना वापरणार आहे. वापरकर्ते Jio AirFiber वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळवू शकतात. मात्र ही सेवा सुरू करण्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच ही सेवा सुरू करू शकते. एक-दोन महिन्यांत ही सेवा सुरू होईल, अशी शक्यता असून चला तर जाणून घेऊया Jio AirFiber बद्दल..
Jio AirFiber सेवेची किंमत किती?
रिपोर्ट्सचा विचार केला तर जिओची ही सेवा जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकते. याचा व्हिडिओही यूट्यूबवर आहे. ज्यात Jio AirFiber चे अनबॉक्सिंग आणि इंस्टॉलेशन दाखवले गेले आहे. कंपनी काही काळापासून या सेवेचा पायलट प्रोजेक्ट अंतर्गत चाचणी करत आहे. व्हिडिओनुसार, ही सेवा दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये पोर्टेबल वाय-फाय राउटर उपलब्ध असेल. आणखी एक नॉन-पोर्टेबल आवृत्ती असेल, जी Wi-Fi 6 सपोर्टसह येईल. त्याची किंमत ५,५०० ते ६००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही.
कसे काम करेल?
दोन्ही मॉडेल व्हिडिओमध्ये दाखवले असून Jio AirFiber वायफाय राउटरसह येत आहे, ज्यामध्ये एक अँटेना म्हणून काम करेल तर दुसरा एक्सटेंडर म्हणून काम करेल. तुम्हाला एक राउटर तुमच्या छतावर किंवा इतर कोणत्याही उंच ठिकाणी ठेवावा लागेल, तर दुसरा घराच्या आत ठेवावा लागेल. हार्डवेअर इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला नेटवर्क कनेक्शन जोडून इन्स्टॉलेशन पूर्ण कराव लागेल. यावेळी, तुम्हाला आधी एअरफायबरमध्ये Jio 5G सिम टाकावे लागेल. त्यानंतर Jio Home अॅप डाउनलोड करुन तुम्हाला Jio Fiber राउटरशी कनेक्ट करावे लागेल आणि नंतर WiFi पासवर्ड टाकावा लागेल, जो राउटरच्या खालच्या बाजूला असेल. वायरलेस कनेक्शन व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना Jio AirFiber मध्ये USB पोर्ट, एक LAN आणि WAN पोर्ट मिळेल. युजर्सना हवं असल्यास, ते सेट-टॉप बॉक्स Jio AirFiber शी कनेक्ट करू शकतात.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा