Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुम्हीही 5G स्मार्टफोन घेत आहात? ‘या’ १० मुद्द्यांचा नक्की विचार करा

7


5G Smartphone Points : दररोज नवनवीन टेक्नोलॉजी मार्केटमध्ये येत आहे, आता ​४जी नेटवर्कचा जमाना जाऊन ५जी नेटवर्कचा जमाना आला आहे. सर्व नवीन येणाऱ्या फोन्समध्ये ५जी नेटवर्क सपोर्ट असल्याने आता तुम्हीही जर स्मार्टफोन घ्यायचा विचार केला तर सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे फोन 5G असावा. पण मार्केटमध्ये सर्वच वेगवेगळ्या कंपन्या 5G फोन्स तयार करत असल्याने ५जीच्या नावाने कोणताही फोन उचलणं योग्य नाही. कारण आज मार्केटमध्ये बजेट सेगमेंटमध्ये 5G फोन आले आहेत आणि प्रत्येकजण सर्वोत्कृष्ट 5G अनुभवाचा दावा करत आहे, परंतु त्यापैकी सर्वोत्तम 5G फोन कोणता, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे ५जी फोन घेताना काही खास गोष्टींबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.. त्याबद्दलच आज जाणून घेऊ…

डॉल्बी इंटीग्रेशन

दमदार आवाजासाठी डॉल्बी साऊंड तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 5G फोनकडे जात असाल आणि मोठ्या डिस्प्ले आणि सुपर फास्ट इंटरनेटबद्दल बोलत असाल तर नक्कीच साउंड तंत्रज्ञानाकडे लक्ष द्या. विशेषत: जर तुम्ही मनोरंजनासाठी फोन घेत असाल किंवा OTT आणि गेमिंग म्हणा, तर नक्कीच डॉल्बी इंटीग्रेशन तपासा.

​वाचा : आता तुमचं प्रायव्हेट चॅट राहिल एकदम ‘प्रायव्हेट’, असं लॉक करा WhatsApp​

जास्तीत जास्त 5g बँड सपोर्ट हवा

-5g-

सध्या Jio आणि Airtel यांनी भारतात 5G सेवा सुरु केली आहे. Jio आणि Airtel ची 5G सेवा अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. त्याचवेळी, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, एअरटेलकडे 5G साठी 900 MHz (n8), 1800 MHz (n3), 2100 MHz (n1), 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) बँड आहेत. ही कंपनी 5G सेवेसाठी N8 आणि N3 बँड वापरत आहे. दुसरीकडे, Jio 5G बँड्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीकडे 700 MHz (n28), 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n58) बँड आहेत आणि जिओ N28 आणि N78 बँड्सचा वापर करत आहे. यावरुन तुम्ही समजू शकता की भारतात तुम्हाला या बँड्सवर 5G सेवा मिळत आहे आणि भविष्यात हेच बँड वापरले जाणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 5G फोन घेण्याचा विचार करत असाल, तर या बँड्सवर नक्कीच लक्ष ठेवायला हवे. शक्य असल्यास, जास्तीत जास्त 5G बँड सपोर्ट असलेला तोच फोन निवडा.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

प्रोसेसर फॅब्रिकेशन

प्रोसेसर फॅब्रिकेशन

आतापर्यंत सर्वत्र तुम्हाला सल्ला दिला जातो की ज्या फोनचा प्रोसेसर स्पीड जास्त असेल तो फोन निवडा. पण बदलत्या युगात स्मार्टफोन तंत्रज्ञानात आजकाल प्रोसेसर फॅब्रिकेशन देखील फार महत्त्वाचं झालं आहे. सध्या 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रोसेसरवर तयार केलेले फोन बाजारात येत आहेत, जर तुम्ही ते निवडले तर ते सर्वोत्तम आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

हिट डिस्पेनशन सिस्टिम हवी

हिट डिस्पेनशन सिस्टिम हवी

जर तुम्ही 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर तर इंटरनेट ब्राउझिंगसोबत तुम्ही ऑनलाइन गेमिंग आणि हेवी अॅप्स वापराल. अशा परिस्थितीत, तुमचा फोन अधिक हिट पैदा करेल जी कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे फोन कूलिंग चेंबर सारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज असणं महत्वाचं आहे. यामुळे, इंटरनेट वापरादरम्यान किंवा ऑनलाइन गेमिंग दरम्यान प्रोसेसर गरम झाला तरीही, उष्णता नष्ट करणे आणि कूलिंग चेंबर सारखी वैशिष्ट्ये तापमान राखतील आणि फोनची कार्यक्षमता राखतील. हे पाहणं गरजेचं आहे.

​वाचा : जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

UFS मेमरी

ufs-

UFC मेमरी म्हणजेच कायतर फ्लॅश मेमरी आता फोनमध्ये जलद डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जेवढे चांगले प्रोसेसर आणि रॅम तंत्रज्ञान आवश्यक आहे, तेवढेच महत्त्वाचे म्हणजे फ्लॅश मेमरी म्हणजेच इंटरनल मेमरी टेक्नोलॉजी. तुमच्या मेमरीला UFS सपोर्ट असेल तर ते अधिक चांगले म्हणता येईल. मार्केटमध्ये 4.0 UFS फोन असले तरी 3.0 किंवा 3.1 UFS फोन घेतले तरी ते चांगलेच आहे.

​​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

8GB RAM चा फोन हवा

8gb-ram-

तुमचा 5G फोन तुम्हाला फास्ट चालावा वाटत असेल तर तुम्ही किमान 8GB RAM असलेला 5G फोन निवडावा. 5G फोन जलद नेटवर्क स्पीडवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक मेमरी वापरत असल्यामुळे, तुम्हाला 4GB आणि 6GB रॅमच्या फोनमुळे काही वेळात समस्या येऊ शकतात. त्यामुळे किमान 8GB RAM असलेला फोन निवडा. त्याच वेळी, रॅम तंत्रज्ञान DDR5 असल्यास ते चांगले आहे.

वाचा : घर होईल थिएटरसारखं! 55 इंचांचे ‘हे’ लेटेस्ट स्मार्ट टीव्ही आहेत एकदम बेस्ट, पाहा यादी

पावरफुल बॅटरी हवी

पावरफुल बॅटरी हवी

5G फोनमध्ये बॅटरीचा वापर खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, कमीत कमी 4500 mAh बॅटरीच्या वरचा फोन निवडावा. बॅटरी 5000 mAh किंवा मोठी असल्यास आणखी चांगले असेल. त्यामुळे ५जी फोन निवडण्यासाठी चांगल्या बॅटरीचा फोन निवडणं गरजेचं आहे.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

हाय रिझोल्यूशन स्क्रीन

हाय रिझोल्यूशन स्क्रीन

5G सेवा म्हणजे वेगवान नेटवर्क आणि तुम्ही हे नेटवर्क तुमच्या कार्यालयीन कामासाठी, अभ्यासासाठी किंवा मनोरंजनासाठी वापराणार असाल तर अशा परिस्थितीत तुमचा फोन हाय रेझोल्युशनचा असेल तर वेगवान इंटरनेट वापरण्यात मजा येईल. म्हणूनच आम्ही सल्ला देऊ की मोठ्या स्क्रीनसह, आपण उच्च रिझोल्यूशन पिक्सेल देखील पाहणं गरजेचं आहे. तसेच, जर AMOLED किंवा OLED स्क्रीन पॅनेल असेल तर आणखी चांगलं.

​वाचा : कुठंही जायची गरज नाही, घरात बसून ठीक करू शकता आयफोनची बॅटरी, पाहा टिप्स​​

90 किंवा 120 Hz रिफ्रेश रेट असणारा फोन वापरा

90-120-hz-

तुम्ही 5G फोन घेत असाल, तर किमान 90 Hz स्क्रीन रिफ्रेश रेट असलेला फोन निवडणे चांगले. त्याच वेळी, जर 120 किंवा 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट असेल तर ते अधिक चांगले म्हणता येईल. रिफ्रेश रेट जास्त असल्याने तुम्ही फास्ट स्क्रोलिंग करु शकता.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

फास्ट चार्जिंग

फास्ट चार्जिंग

5G फोनमध्ये बॅटरी खूप वेगाने संपते. इंटरनेट किंवा ऑनलाइन गेमिंग चालू असताना बॅटरी कधी संपेल हेही सांगता येणार नाही. त्यामुळे फास्ट चार्जिंग नक्कीच अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ते 44W किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते चांगले आहे.

​वाचा : Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.