Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PS 2 Box Office- ऐश्वर्या रायच्या पोन्नियिन सेल्वन २ चा वाजला डंका, सलमान खानची वाढली चिंता

8

मुंबई- मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन २’ या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. त्याचा पहिला भाग सप्टेंबर २०२२ मध्ये रिलीज झाला होता. आता निर्मात्यांनी पीएस- २ जवळपास ३ हजार २०० स्क्रीनवर रिलीज केला आहे. या चित्रपटासमोर एक आव्हानही आहे. सध्या सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर आहे, ज्यामुळे मणिरत्नम यांना थोडा त्रास नक्कीच होऊ शकतो. पण ‘पोनियिन सेल्वन २’ च्या सुरुवातीचे आकडे निर्मात्यांना दिलासा देणारे आहेत. त्याचवेळी हिंदी मार्केटचे आकडेही थोडी चिंता वाढवणारे आहेत. ‘पोनियिन सेल्वन २’ चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन काय आहेत तसेच कोणत्या भाषेत सिनेमाला सर्वाधिक प्रेम मिळाले ते पाहू.काळीज तुटतं! अम्मा मला न्यायला आलीय.. इरफान यांचे शेवटे शब्द ऐकून सुतापा यांचा फुटलेला बांध
ऐश्वर्या राय- बच्चन, विक्रम, कार्ती, त्रिशा कृष्णन, जयम रवी, शोभिता आणि ऐश्वर्या लक्ष्मी अभिनीत, ‘पोन्नियिन सेल्वन २’ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सुमारे ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अलीकडच्या काही चित्रपटांनुसार हा आकडा दिलासा देणारा आहे. पण PS2 ची हिंदीतील कमाई निराशाजनक आहे. हिंदीचा व्यवसाय पाहता हिंदी प्रेक्षकाला या सिनेमात फारसा रस नसल्याचे दिसते.

सर्व भाषांतील Ponniyin Selvan – Part 2 Box Office Collection

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘Ponniyin Selvan 2’ ने पहिल्या दिवशी ३०.७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट मुळ तमिळ भाषेत बनला असून या भाषिक प्रेक्षकांनी ऐश्वर्याच्या चित्रपटावर सर्वाधिक प्रेम केले. तमिळमध्ये ‘पोनियिन सेल्वन २’ ने २५ कोटी कमावले. तर मल्याळममध्ये १.२ कोटी, तेलगूमध्ये ३.०, कन्नडमध्ये ०.०३ कोटी आणि हिंदीमध्ये १.५ कोटींची कमाई केली.

‘पोन्नियन सेल्वन १’ vs ‘पोन्नियिन सेल्वन २’

चोल राजवंशाच्या कारकिर्दीवर आधारित पोन्नियिन सेल्वन- १ ने पहिल्या दिवशी देशभरात ४४.०४ कोटींची कमाई केली होती. भाग १ च्या तुलनेत भाग २ च्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. PS1 ने गेल्यावेळी हिंदीत २ कोटी कमावले होते, यावेळी हा आकडाही घसरला आहे.

१९५५ मध्ये कल्की कृष्णमूर्ती यांनी याच नावाने एक कादंबरी लिहिली होती. या कथेवर निर्मात्यांनी दोन भागांचा फ्रँचायझी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन’ बनवला. असं म्हटलं जातं की, मणिरत्नम सुरुवातीला एकच चित्रपट बनवणार होते, पण कथा पूर्ण करताना चित्रपट बराच लांबला. त्यानंतर निर्मात्यांनी तो दोन भागात बनवण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूज १० च्या रिपोर्टनुसार, ‘पोनियिन सेल्वन-१’ चे डिजिटल अधिकार अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला १२५ कोटी रुपयांना विकले गेले.

Rakhi sawant ने कडेवर घेताच बाळाला रडू कोसळलं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.