Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गुरुवारी म्हणजेच रिलीजच्या सातव्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर थोडी समाधानकारक कमाई केली होती. त्याचवेळी आता ‘किसी का भाई किसी की जान’ रिलीजच्या आठव्या दिवसाचेशी म्हणजेच शुक्रवारच्या कमाईचे आकडेही आले आहेत. सलमान खानच्या चित्रपटाने आठव्या दिवशी किती कमाई केली त्यावर एक नजर टाकू.
सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. सातव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण होत फक्त ३.५ कोटींचा व्यवसाय केला. त्याचवेळी, चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे आकडेही आले आहेत, जे आणखीच निराशाजनक आहेत. खरं तर, आठव्या दिवशी ‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला असून सिनेमाने देशभरात फक्त २ कोटींचीच कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ९२.१५ कोटींवर गेली आहे.
या वीकेंडला KKBKKJ चा १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभाग होणं कठीण‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर कमी होताना दिसत आहे. आठव्या दिवशी चित्रपटाची कमाई सर्वात कमी झाली आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता या वीकेंडला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणे कठीण आहे. सध्या शनिवार आणि रविवारच्या कलेक्शनवर निर्मात्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या वीकेंडला हा चित्रपट १०० कोटींचा जादुई आकडा गाठू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फरहाद सामजी यांनी केलं ‘किसी का भाई किसी की जान’ चं दिग्दर्शन
‘किसी का भाई किसी की जान’ हा फरहाद सामजी दिग्दर्शित मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर व्यंकटेश, भूमिका चावला, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्यासह अनेक कलाकार चित्रपटात आहेत.
Rakhi sawant ने कडेवर घेताच बाळाला रडू कोसळलं