Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

TECNO Spark 10 5G स्मार्टफोन लाँच, स्वस्त किंमतीचा 5G फोन

7

नवी दिल्लीः टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Spark 10 5G लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये एक मोठी रॅम सोबत पॉवरफुल स्टोरेज सपोर्ट दिले आहे. १५ हजार रुपये किंमतीत १६ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेज दिले जात नाही. परंतु, टेक्नोने या किंमतीत पॉवरफुल स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5000mAh च्या बॅटरी सोबत मोठा डिस्प्ले आणि तगडे प्रोसेसर दिले आहे.

फोनची किंमत आणि ऑफर्स
Tecno Spark 10 5G स्मार्टफोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. हा एक अमेझॉन स्पेशल स्मार्टफोन आहे. या फोनला अमेझॉनवरून खरेदी करू शकता. फोनची विक्री २ मे २०२३ पासून सुरू होणार आहे. फोनला आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक वरून खरेदी केल्यास १० टक्के बचत करता येऊ शकते.

फोनची स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 10 5G मध्ये 6.56 इंचाचा HD+Dot डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720*1612 पिक्सल आहे. फोन 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येतो. याशिवाय, 120Hz टच सॅम्पलिंग रेट दिला आहे. फोनमध्ये 480 nits पिक ब्राइटनेस दिले आहे. फोन स्पार्कल टेक्सचर व्हाइब्रेंट डिझाइन मध्ये येतो. फोनच्या फ्रंट मध्ये 8MP AI सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो ड्यूल सेल्फी लाइट सपोर्ट सोबत येतो. याचा फ्रंट कॅमेरा AI पोर्टेट, एआय ब्युटी, कलर सारख्या फीचर्स सोबत येतो.

वाचाः तुम्हीही 5G स्मार्टफोन घेत आहात? ‘या’ १० मुद्द्यांचा नक्की विचार करा

या फोनमध्ये रियरमध्ये 50MP+AI कॅमेरा सेन्सर दिले आहे. जे PDAF आणि ड्यूल फ्लॅशलाइट सपोर्ट सोबत येते. याचा रियर कॅमेरा सुपर नाइट मोड , सुपर नाइट फिल्टर सारख्या सपोर्ट सोबत येतो. सोबत 10X झूम सपोर्ट दिले आहे. फोनमध्ये १६ जीबी रॅम सपोर्ट मिळते. यात 8GB LPDDR4x रॅम आणि 8GB Mem Fusion रॅम सपोर्ट दिले आहे. सोबत २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट मिळू शकते. फोनमध्ये १ टीबी एसडी कार्ड सपोर्ट दिले आहे. फोनमध्ये 5000mAh लीथियम ऑयन बॅटरी दिली आहे. सोबत 18W फ्लॅश चार्जर सपोर्ट दिले आहे.

वाचाः Apple Days Sale सुरू, स्वस्तात खरेदी करा iPhone मॉडल्स, पाहा लिस्ट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.