Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘पोन्नियिन सेल्वन २’ च्या निर्मात्यांना हा चित्रपट जवळपास तीन हजार २०० स्क्रिनवर प्रदर्शित केलाय. त्यामुळं हा चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहोला आहे. चोल साम्राज्याच्या कथेवर आधारित या चित्रपटाच ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम आणि कार्थी यांसारखे कलाकार असल्यानं ही चित्रपटाची जमेची बाजू ठरत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर समिक्षक आणि प्रेक्षकही सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.फक्त भारतातच नाही तर, भारताबाहेरही चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय.
लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या तमिळ भाषेत गाजलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या महाकादंबरीवर हा चित्रपट आधारित आहेत. ‘पीएस१’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
‘पीएस१’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात चोल या साम्राज्याबाबत माहिती देत थेट त्यातल्या घडामोडी आणि राजकारणाची कथेत मांडणी केली. नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत चोल राजघराण्यानं दक्षिणेत, विशेषत: तमिळनाडू आणि श्रीलंकेतील काही भागांत राज्य केलं. पहिल्या भागाच्या शेवटाला येणाऱ्या ट्विस्टची उत्तरं मणी यांनी दुसऱ्या भागात दिली आहेत आणि हा भाग आधीच्या तुलनेत समजण्यास सोपा, वेगवान आणि यातल्या भूमिका समजून घेण्यास वाव देणारा आहे.
शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटानं भारतात आणि परदेशात असा मिळून तब्बल ६१ .३५ कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्याच दिवशी तगडी कमाई केल्यानंतर आता चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पकड मजबूत केली आहे. दुसऱ्याच दिवशी चित्रपटानं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
ऐश्वर्याच्या या सिनेमानं प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तब्बल २६ कोटींहून अधिकची कमाई केली. तमिळनाडूमध्ये या चित्रपटाला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली होती. फक्त भारतातील कमाई बद्दल बोलायचं झालं तक PS2 चित्रपटानं दोन दिवसात ५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.