Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Whatsapp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

9

नवी दिल्ली : Whatsapp Tips and Tricks : बदलत्या डिजीटल युगात आता सगळंकाही ऑनलाइन होत आहे. सर्वजण आजकाल अगदी छोट्या दुकानापासून ते मोठमोठ्या ज्वेलर्समध्येही ऑनलाईनच पेमेंट करत असतात. यामुळेच आता अनेक कंपन्या बिल भरण्याच्या ऑनलाईन पद्धती ऑफर करत आहेत. त्यात आपण सर्वाधिक वापरणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲपद्वारे जर वीज बिल भरु शकलो तर? हो आता मध्य प्रदेशातील वीज ग्राहक व्हॉट्सॲपद्वारे वीज बिल भरू शकणार आहेत. या उपक्रमामुळे वीज बिल भरणे आणखी सोपे होणार असून रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून ही नागरिकांची सुटका होणार आहे. चला तर जाणून घेऊ व्हॉट्सॲपद्वारे वीज बिल कसं भरता येईल ते…‘व्हॉट्सॲप’पे च्या मदतीनं करु शकता पेमेंट
सेंट्रल रिजन पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत त्याने सांगितले की, आम्ही डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. वीजबिल भरण्यासाठी अनेक पर्याय आहेत. आता यामध्ये आम्ही व्हॉट्सॲप-पे हा पर्याय देखील ग्राहकांच्या आणखी सोयीसाठीन जोडला आहे. व्हॉट्सॲप-पे फीचरद्वारे वीज बिल आता सहजरित्या भरता येईल. यूजर् व्हॉट्सॲप अकाउंट वापरून त्यांचे बँक खाते लिंक करू शकतात. जर त्यांच्याकडे WhatsApp Pay ची सुविधा नसेल तर ते Google Pay, Phone Pay किंवा Paytm द्वारे UPI पेमेंट करू शकतात.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

कसं कराल पेमेंट?
या नवीन सुविधेचा वापर करण्यासाठी, वापरकर्त्याला कंपनीचा टोल फ्री क्रमांक 07552551222 त्याच्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे त्यावर चॅट करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला व्ह्यू आणि पे बिल पर्याय वापरून तुमचं पेमेंट पूर्ण करावं लागेल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल. तुम्ही portal.mpcz.in वर भेट देऊन किंवा 1912 वर कॉल करून किंवा तुमच्या जवळच्या वीज वितरण केंद्राशी संपर्क साधून या विषयावर अधिक माहिती मिळवू शकता.

वाचा : कुठंही जायची गरज नाही, घरात बसून ठीक करू शकता आयफोनची बॅटरी, पाहा टिप्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.