Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Wireless Charger हवाय? १००० रुपयांच्या आत मिळेल, हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

9

Wireless Chargers in Budget : टेक्नोलॉजीमध्ये दररोज नवनवीन शोध लागत आहेत. म्हणजे एकेकाळी अगदी एखाद्या खोलीएवढा मोठा कंप्युटर आज अगदी कॉम्पॅक्ट येत आहे, तेही जास्त फीचर्ससह. तसंच दररोज नवनवीन शोध लागतच असून वायरलेस चार्जर हा एक फार भारी शोध असून यामुळे फोन चार्ज करणे खूप सोपे झाले आहे. आता यामुळे वायर्सचं टेन्शन नाही की काही नाही, तुम्हाला फक्त फोन चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल आणि काही तासांतच तुमचा फोन चार्ज होईल. आता तुम्हीही वायरलेस चार्जर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही वायरलेस चार्जर्सची यादी शेअर करत आहोत. जे अगदी बजेटमध्येही आहेत आणि चांगल्या कंपनीचेही आहेत. यांच्या मदतीने तुम्हील स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच आणि इतर उपकरणे वायरलेस पद्धतीने चार्ज करू शकता, चला तर पाहुया या चार्जर्सची यादी…

UNIGEN UNIPAD ​ (९९९ रुपये)

UNIGEN UNIPAD हा एक उत्कृष्ट डिझाइन असणारा

वायरलेस चार्जर आहे. या चार्जरमध्ये कंपनीने चांगल्या क्वॉलीटीचे साहित्य वापरल्याने याची बिल्ड क्वॉलिटीही चांगली आहे. या चार्जरमध्ये रंग बदलणारा एलईडी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे Unigen Unipad चं खास फीचर म्हणजे हे फोनवर केस असतानाही फोन चार्ज करते. हा चार्जर Qi वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. यासोबतच हे क्विक चार्ज 2.0/3.0 आणि 15W स्पीडसह येते.

​वाचा : Battery Saver: फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

RAEGR Arc One (८९९ रुपये)

raegr-arc-one-

RAEGR कंपनीचा RAEGR Arc One हा फास्ट वायरलेस चार्जर Qi प्रमाणित आहे. यात 15W/10W/7.5W/5W फास्ट चार्जसाठी सपोर्टेड आहे. हा एक बजेट वायरलेस चार्जर उपलब्ध आहे. हे Apple MagSafe सपोर्टसह येत असल्याने iPhone 14/13/12 हे देखील याने चार्ज करू शकते. यासोबतच या चार्जमध्ये आर्क वन आणि एअर व्हेंटचाही सपोर्ट घेण्यात आला आहे.

​वाचा : iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

eller santé® (MONTCLAD Series) (९९९ रुपये)

eller-sant-montclad-series-

eller santé® हा देखील एक आकर्षक आणि स्टाइलिश डिझाइनसह येणारा वायरलेस चार्जर आहे. यात हीट योग्यप्रकारे मॅनेज होईल असं डिझाइन आहे. जे चार्जिंग दरम्यान फोन आणि चार्जर दोन्ही थंड ठेवतं. हा चार्जर ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन, ओव्हरसी प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि ओव्हर चार्जर प्रोटेक्शनसह येतो. यासोबत, हा केस फ्रेंडली चार्जर असून फोनला केस जोडलेला असतानाही डिव्हाइस चार्ज करतो. यासोबतच बिल्ट इन LED येतो. हे जास्तीत जास्त 15W गतीसह येते.

​वाचा : जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

​boAt floAtpad 350 (९४९ रुपये)

boat-floatpad-350-

वायरेल हेडफोन्स, इअरबड्ससाठी प्रसिद्ध कंपनी बोटचा हा boAt floAtpad 350 वायरलेस चार्जर या यादीत आहे. हा चार्जर 6mm ट्रान्समिशन रेंजसह येतो, स्लीप प्रीमियम रबर डिझाइन याात असून हा लाइटवेट वायरलेस चार्जर स्मार्टफोन आणि इतर उपकरणांना देखील सहज चार्ज करतो. boAt floAtpad 350 12-लेयर स्मार्ट IC संरक्षणासह येतो, जे ओव्हरचार्ज, ओव्हरकरंट, अचानक व्होल्टेज संरक्षणासह येते. यात 5W/7.5W/10W/15W चार्जिंग स्पीड सपोर्टेड आहे.

​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Spigen Essential Wireless ​(६९९ रुपये)

spigen-essential-wireless-

Spigen Essential Wireless चार्जर हा कंपनीने 6mm स्लिम डिझाईन आणि नो स्लिप पॅडसह आणला आहे. हा चार्जर 15W फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. यासोबतच, कंपनीचा दावा आहे की हा चार्जर अगदी टिकाऊ आहे जो अनेक क्वॉलीटी चेकअप्ससह येतो. कमी तापमान आणि ड्रॉप चाचणी असे फीचर्सही यात आहेत.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Unigen Unipad (९९९ रुपये)

unigen-unipad-

Unigen Unipad कंपनीचा आणखी एक प्रीमियम डिझाइन असणारा चार्जर या यादीत आहे. हा देखील अगदी स्लिम आणि प्रीमियम बिल्टसह येतो. 6mm अल्ट्रा थिन अँटी फॅब्रिक लेयरसह हा चार्जर येत असून हा चार्जर केस फ्रेंडली देखील आहे. कंपनीने या चार्जरमध्ये एलईडी इंडिकेटरही दिले आहेत. या वायरलेस चार्जरमध्ये सेफ्टी कंट्रोल मेकॅनिझम देण्यात आला आहे, ज्यामध्ये तापमान नियंत्रण, सर्च प्रोटेक्शन आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन 15W चार्जिंग स्पीडसह येतो.

​​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

AmazonBasics Qi-Certified Fast Wireless Charger Square Pad (९२९ रुपये)

amazonbasics-qi-certified-fast-wireless-charger-square-pad-

AmazonBasics Qi-Certified Fast Wireless Charger Square Pad हा वायरलेस चार्जर देखील खास फीचर्ससह येतो. बजेटच्या दृष्टीने देखील हा एक दमदार चार्जर आहे. तुम्हालाही वायरचे जाळे कमी करायचे असेल, तर Amazon वरील हा वायरलेस चार्जर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. अॅमेझॉनने या चार्जरमध्ये टिकाऊ साहित्याचा वापर केला आहे. यासोबतच यामध्ये 360-डिग्री नॉन-स्लिप टीपीयू कोटिंग देण्यात आली आहे. हा चार्जर 5 मिमी पर्यंत केस जोडलेला असतानाही फोन सहजपणे चार्ज करतो. या चार्जरचा वेग 15W आहे.

​वाचा : फेक कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार, Aitel Jio आणि Vi चा AI बेस्ड नवा प्लान

X88Pro (१९९९ रुपये)​

x88pro-

X88 Pro हा या यादीतील एक काहीसा महाग वायरलेस चार्जर आहे. X88 Pro वायरलेस चार्जर iPhone, Samsung, Google Pixel आणि Motorola तसेच AirPods Pro, Galaxy Buds आणि कोणतेही Qi-सपोर्टेड डिव्हाइस चार्ज करू शकतो. हा चार्जर 15W/10W/7.5W/5W चार्जिंग स्पीड ऑफर करतो, ज्यामुळे तुम्ही त्याच्यासह विविध प्रकारचे डिव्हाइस चार्ज करू शकता. हे केस असतानाही फोन चार्ज करु शकतो. म्हणजे एकंदरीत हा एक सर्व क्वॉलीटी असणारा चार्जर आहे.

​​वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

Portronics Freedom 2

portronics-freedom-2

पोर्ट्रोनिक्स फ्रीडम 2 हा वायरलेस चार्जर सध्या विक्रीसाठी उपलब्ध नसला तरी हा एक फास्ट चार्जिंगसाठी बेस्ट पर्याय आहे. 15W चार्जिंग स्पीडसह हा फोन येत असून कंपनीचा दावा आहे की हा आयफोन 13 फक्त 60 मिनिटांत 35 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकतो. यात यूएसबी टाइप सी इनपुट सपोर्टेड आहे. पोर्ट्रोनिक्सचा हा चार्जर मजबूत ABS मटेरियलने बनलेला आहे. तसेच त्याचं केस फ्रेंडली डिझाइन ही खास फीचर आहे.

वाचा : Smartphone Explode : हीच ‘ती’ ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, ‘अशी’ घ्या काळजी​

​Wireless Fast Charging Stand for Phones (10W) (५९९ रुपये)

wireless-fast-charging-stand-for-phones-10w-

जर तुम्ही स्टँड असणारा वायरलेस चार्जर शोधत असाल तर तुमच्यासाठी हे Wireless Fast Charging Stand for Phones (10W) हे बेस्ट पर्याय आहेत. चित्रपट किंवा ऑनलाइन स्ट्रीमिंगची मजा घेता घेता तुम्ही फोनही चार्ज करु शकता. यामध्ये 10W वायरलेस चार्जिंगचा स्पीड उपलब्ध आहे. हा चार्जर Qi प्रमाणित आहे, जो केस चालू असतानाही फोन चार्ज करतो. यासोबतच यूजर्सना ओव्हरकरंट प्रोटेक्शन, टेम्परेचर प्रोटेक्शन आणि ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन मिळते.

​वाचाः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारावरून वाद, जाणून घ्या त्यांची सॅलरी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.