Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Airtel Recharge : एअरटेलचा खास १७९ रुपयांचा रिचार्ज, डेटासह कॉलिंगही अनलिमिटेड

8

नवी दिल्ली : Airtel Prepaid Plans : सध्या भारतातील एक आघाडीचं नेटवर्क म्हणाल तर एअरटेल आहे. त्यांनी जिओप्रमाणे ५जी नेटवर्कचं जाळं वाढवलं आहे. एअरटेलकजे विविध किंमतीत ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आहेत. एअरटेलचे ग्राहक त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार नवनवीन प्लान निवडू शकतात. जर तुम्ही कमी डेटा वापरत असाल किंवा वाय-फाय नेटवर्कमध्ये जास्त काळ असाल आणि तुम्हाला फक्त घर आणि ऑफिसच्या बाहेर इंटरनेटची गरज असेल, तर तुम्ही १७९ रुपयांचा खास एअरटेल प्लान निवडू शकता. एअरटेलच्या या १७९ रुपयांच्या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंसग डेटादेखील मिळतो. एअरटेलच्या या स्वस्त प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घ्या…१७९ रुपयांचा एअरटेल प्रीपेड प्लान
एअरटेलच्या १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 50 पैसे प्रति एमबी दराने इंटरनेटसाठी पैसे द्यावे लागतील. Airtel च्या या प्लानमध्ये एकूण ३०० SMS (दररोज जास्तीत जास्त १०० SMS) ऑफर केले जातात. प्लानमध्ये मिळालेले मेसेज संपल्यानंतर, तुम्हाला लोकल एसएमएससाठी १ रुपया या दराप्रमाणे तर STD SMS साठी १.५ रुपये याप्रमाणे पैसे मोजावे लागतील. एअरटेलचा हा प्लान अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येतो. म्हणजेच, ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर देशभरात लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. एअरटेलच्या ग्राहकांना या प्लानमध्ये मोफत हॅलोट्यून्स सुविधा मिळते. याशिवाय विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शनही या पॅकमध्ये दिले आहे.

३००० हून अधिक शहरांत Airtel 5G
Airtel ची अल्ट्रा-फास्ट 5G सेवा आता देशातील ३००० हून अधिक शहरांसह गावांमधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या सेवा जम्मूमधील कटरा ते केरळमधील कुन्नूर, बिहारमधील पाटणा ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी, अरुणाचल प्रदेशातील इटानगर ते दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशापर्यंत आहेत. तसेच, Airtel 5G Plus सेवा देशातील सर्व प्रमुख शहरी आणि ग्रामीण भागात पोहोचली आहे. एअरटेलने देशातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये 5G संबधित माहिती पुरवण्यासाछी खास ५जी एक्सपिरियन्स तयार केला आहे. अल्ट्राफास्ट Airtel 5G Plus चा अनुभव घेण्यासाठी ग्राहक कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊ शकतात.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.