Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४ दिवसांतच १०० कोटींच्या पलिकडे गेला PS 2, जे भाईजानला जमलं नाही ते ऐश्वर्याने करून दाखवलं

11

मुंबई- दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चोल साम्राज्याचा इतिहास अशा प्रकारे पडद्यावर आणला की चाहते या चित्रपटाचे कौतुक करताना थकले नाहीत. ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम स्टारर या चित्रपटाने जगभरात यश मिळवले आहे. मूळ तमिळ भाषेत बनलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन- २’ ने चित्रपटगृहात तुफान कामगिरी करत आहे. भारतात एकूण कलेक्शनच्या बाबतीत ऐश्वर्या रायच्या चित्रपटाने भाईजान सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ला मागे टाकले आहे.आर्यन खानचा क्लोदिंग ब्रँड की चेष्ठा, जॅकेट, स्वेटशर्ट अन् टी-शर्टची किंमत वाचून चक्करच येईल
पोनियिन सेल्वन-२’ ने १०० कोटींचा टप्पा पार केला

मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात लोकांमध्ये नंदिनी उर्फ ऐश्वर्या राय आणि इतर पात्रांची क्रेझ स्पष्टपणे दिसत आहे. PS-1 ला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर निर्मात्यांनी पॅन इंडिया या चित्रपटाचा दुसरा भागही रिलीज केला. विशेष म्हणजे पीएस-१ प्रमाणेच पोन्नियिन सेल्वान-२ लाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

कन्नड भाषा वगळता हा सिनेमा इतर सर्व भाषांमध्ये चांगली कमाई करत आहे. वीकेंडला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सिनेमाने सुमारे ७९ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या मणिरत्नम यांच्या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशीच भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला. सोमवारपर्यंत सिनेमाने एकूण १०५.२ कोटींचे कलेक्शन केले. पीएस- २ भारतीय बॉक्स ऑफिसवरचं एकूण कलेक्शन किसी की भाई, किसी की जानपेक्षा जास्त आहे.

पोनियिन सेल्वन-२ ने सर्व भाषांमध्ये किती कमाई केली

पोनियिन सेल्वन २ इतर भाषांमध्येही चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाला तमिळ भाषेत भरभरून प्रेम मिळत आहे. सोमवारी चौथ्या दिवशी तमिळ भाषेतील PS-2 ने एकूण १९.६४ कोटींचा गल्ला जमवला आहे. तमिळमध्ये या चित्रपटाने आतापर्यंत ८१.५६ कोटींची कमाई केली असून लवकरच तो फक्त तमिळमध्ये १०० कोटींची कमाई करेल.

याशिवाय हिंदीत PS-2 ने सोमवारी १.९६ कोटींची कमाई केली आणि त्याची एकूण कमाई ९.१७ कोटी झाली आहे. या चित्रपटाने तेलगूमध्ये आतापर्यंत ९.१६ कोटी, मल्याळममध्ये ५ कोटी आणि कन्नडमध्ये १३ लाखांचा व्यवसाय केला आहे.

५०० कोटींच्या बजेटमध्ये बनला सिनेमा

मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटी आहे. पोनियिन सेल्वन-१ ने जगभरात एकूण ५०० कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, कार्ती या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मराठी सिनेमा संपतोय आणि संपवला जातोय का? TDM चित्रपटाला थिएटर मिळेना, कलाकारांना अश्रू अनावर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.